Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थिनी कु. सृष्टी काकडे हिचा सत्कार





प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 95.6% गुण; आईच्या शाळेचा 100% निकाल 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मोर्शी:-मोर्शी तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी कु. सृष्टी काकडे  हिने दहावीच्या परीक्षेत 95.6% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. तसेच तिची आई सौ. विजयाताई काकडे  या प्राचार्य असलेल्या ऄ. आर. पाटील पब्लिक स्कूल, मोर्शी शाळेचा यंदा 100% निकाल लागला. या दुहेरी यशाबद्दल संत गाडगे ज्येष्ठ नागरिक मंडळ अमरावती तर्फे सृष्टीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ. विजयाताई काकडे  यांचा सुद्धा यथोचित सत्कार करण्यात आला

सत्कार सोहळ्यास संत गाडगे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष, प्रादेशिक विभाग अध्यक्ष तथा राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सहसचिव श्री पुरुषोत्तम गावंडे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मार्गदर्शक प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, अमरावती जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव मुख्याध्यापक श्री गजेंद्र पाथरे, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य दादाराव दाभाडे व पुनर्वसन कॉलनीतील प्रतिष्ठित नागरिक श्री रामधन ठाकरे  हिवताप कर्मचारी संघटनेने पदाधिकारी श्री.विनय शेलुर उपस्थित होते.  

अमरावती जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष व कामगार नेते श्री दामोदर पवार यांनीही शुभेच्छा संदेश पाठवून सृष्टीचे अभिनंदन केले.  

श्री गावंडे व श्री पाथरे यांनी मनोगत व्यक्त करताना मायलेकींच्या संघर्षाचे व यशाचे कौतुक केले. प्राचार्य खांबरे म्हणाले, _प्रतिकूल परिस्थिती, अपुऱ्या सुविधा व संघर्षमय जीवनावर मात करीत सृष्टीने जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमातून हे यश मिळवले. ग्रामीण भागातील गुणवत्तेचे हे जिवंत उदाहरण आहे. मेहनत व आत्मविश्वास असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येत नाही, हे सृष्टीने सिद्ध केले."_  

सत्काराला उत्तर देताना सृष्टी काकडे हिने आपल्या यशाचे श्रेय अभ्यासू आई सौ. विजया काकडे मायाळू आजी, तसेच शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख सर व सर्व शिक्षकवृंद यांना दिले. बारावीतही असेच यश मिळवण्याचा निर्धार तिने व्यक्त केला.  

प्राचार्य सौ. विजयाताई काकडे यांनी 100% निकालाचे श्रेय शाळेचे संचालक आदरणीय राहुलजी मोहोड, सौ. पुनम मोहोड मॅडम संपूर्ण स्टाफ व विद्यार्थ्यांना दिले. त्या म्हणाल्या, _"सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आजचे यश मिळाले. सृष्टी बारावीतही घवघवीत यश मिळवेल, यासाठी आपले आशीर्वाद व प्रेरणा कायम राहो."_  

यावेळी अंधारे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री गजेंद्र पाथरे यांनी केले.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या