चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-जिल्ह्यातील गोपीवाडा गावातील कमांडो ग्रुप हा सामाजिक कार्य, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणासाठी नेहमीच उत्कृष्ट कार्य करत असल्याने ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच “ऑपरेशन बर्ड सेव” राबवून त्यांनी एक आदर्श निर्माण केला होता. त्याचप्रमाणे आता जंगली प्राण्यांच्या संरक्षणासाठी “सेव्ह अॅनिमल” हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत जंगल आणि डोंगराळ भागात जमिनीत खड्डे करून त्यात पॉलिथिन अंथरून पाण्याचा साठा करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमध्ये नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटतात, अशा वेळी प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे हे अत्यंत स्तुत्य कार्य आहे. या उपक्रमामुळे जंगली प्राणी आणि पक्ष्यांची तहान भागविण्यास मदत होत आहे.
कमांडो ग्रुपचे संस्थापक चंद्रशेखर डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश गहाणे, विशाल माहुर्ले, तुषार झलके, साहिल वैद्य, अवि वैद्य, रोहित धोतरे, सौरभ गभणे, शुधांशु मेश्राम, गावेश दंडारे, विक्की वैद्य, हर्षा बोंद्रे, हिना झंझाळ, समीक्षा वैद्य, माही वैद्य, लक्ष्मी भदाडे, श्रुती कारेमोरे, विवेक झंझाळ, श्रेयस वडीचार, निखील देवगडे, चिन्मय मने, प्रशांत देवगडे या सर्व युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.


0 टिप्पण्या