Ticker

6/recent/ticker-posts

सापडलेला ७५ हजार रुपये किमतीचा आयफोन केला परत

    
शिक्षक समाज आणि विद्यार्थ्यांचा आदर्श असतो 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-शिक्षक समाजाचा आरसा असतो, विद्यार्थ्यांचा आदर्श असतो आणि कुटुंबासाठी प्रेरणादायक असतो. असाच एक नवा आदर्श साकोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ येथील सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर माहुरे आणि त्यांचा मुलगा सारंग यांनी समाजासमोर आणि विद्यार्थ्यांसमोर ठेवला. सविस्तर बातमी अशी की, गणेश वार्ड येथील जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळेतील सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर माहूरे व मुलगा सारंग हे रात्री १०:१५ ला गोरेगाव वरून परत येत होते. परत येतांना प्रगती कॉलनी महामार्ग गति अवरोधकावर पडलेला आयफोन सारंगला दिसला. फोन कुणाचा असेल म्हणून त्यांनी सोशल मिडीयाचे प्रमुख आशिष चेडगे यांच्याशी संपर्क साधला. साकोली व्हाईस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष आशिष चेडगे यांनी लगेच दखल घेऊन हा मेसेज फॉरवर्ड केला. सदर भ्रमणध्वनी डॉ. आलोक कापगते यांची ताई जानकी झोडे ( कापगते ) यांचा असल्याचे माहित झाले. आम्ही जेवणाला बाहेर गेलो असतांना दूचाकी वरून भ्रमणध्वनी पडला असल्याचे त्यांनी सांगितले. तातडीने शिक्षक ज्ञानेश्वर माहूरे, मुलगा सारंग माहूरे व पत्रकार आशिष चेडगे यांनी सोबत जाऊन भ्रमणध्वनी त्यांच्याकडे स्वाधीन केला. यावर सर्व कुटूंबियांनी शिक्षक माहूरे, सारंग माहूरे व साकोली मिडियाचे आशिष चेडगे यांच्या प्रामाणिकतेबद्दल आभार मानले. एका जिल्हा परिषद शाळेतील प्रामाणिक शिक्षकांनी खरंच माणूसकीची मिसाल कायम ठेवली. याबद्दल सर्व जिल्हा परिषद शिक्षण क्षेत्रात व साकोलीकरांनी शिक्षक ज्ञानेश्वर माहूरे, मुलगा सारंग माहूरे आणि साकोली मिडियाचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या