Ticker

6/recent/ticker-posts

निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराज पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा



चित्रा न्युज प्रतिनिधी 

पुणे:-निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने गावातून श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली.

गावातील स्वामीभक्त महिलांनी चौकाचौकात आकर्षक रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले. महादेव भजनी मंडळाच्या भजनाच्या साथीने दिंडीने संपूर्ण गाव प्रदक्षिणा केली. पालखी मंदिरात आल्यानंतर रात्री 8 ते 9 या वेळेत ह.भ.प. श्री रेवणसिद्ध सलगर महाराज, पंढरपूर यांचे स्वामी चरित्रावर सुश्राव्य प्रवचन झाले. प्रवचनानंतर जप आणि आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमानंतर सर्व स्वामी भक्तांना श्री आप्पासाहेब तुळशीराम बोंद्रे यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील स्वामीभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रांगोळी सेवेची जबाबदारी सौ. शितल सुनील सुतार यांनी सांभाळली. रांगोळीसाठी फुलांची सेवा श्री महादेव मारुती माळी यांनी दिली. प्रवचन सेवेचे मानधन श्री राजाराम संभाजी जाधव यांच्याकडून देण्यात आले.

या वेळी निमसाखर गावचे दिव्यांग पत्रकार कु. गणेश धनवडे यांना स्वामी सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार ह.भ.प. श्री रेवणसिद्ध सलगर महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या