Ticker

6/recent/ticker-posts

किरणापूर येथे नालंदा बुद्ध विहारात बुद्ध जयंती साजरी. भीम शाहीर प्रदीप कडबे यांचा गायनातून रसिक मंत्रमुग्ध.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 रामटेक : तालुक्यातील किरणापूर येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त नालंदा बुद्ध विहारात शुक्रवार दिनांक 01/05/ 2026 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनातून तथागत भगवान गौतम बुद्ध - देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर! आपले विचार, आपले वागणे, आणि आपले कर्म, आपले नशीब लिहितात. क्रांतिकारी महापुरुषाचे  विज्ञानवादी विचार मांडून  भीम गीत सादर केले. सदर कार्यक्रमाला जनसेवा भजन मंडळाचे सुप्रसिद्ध गायक दुतीयो धन कडबे, गायक  सोपाक कडबे, संघपाल कडबे, मनोज मेश्राम, बाबूलाल देशपांडे, राहुल देशपांडे,रू पे स सोमकुवर, सुरेश सहारे, चंद्रभान कुथे, अर्णव कडबे, उत्कर्ष कडबे, सक्षम कडबे अभिमन खांडेकर, इत्यादी समाज बांधव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या