चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-जिल्ह्यातील गुरांच्या बाजारासाठी देशात प्रसिध्द असलेल्या हाळी व हंडरगुळी येथील एस.टी.बसस्थानक व तिरु नदीवर तसेच पाञात जनतेकडून होत असलेली घाण साफ करा.बीफ व मांसचे वेस्टेज पदार्थ तिरुनदीत व राज्यमार्गावर टाकणा-यांवर कायदेशीर कारवाई करा,अन्यथा १० जुन रोजी हाळी येथील ग्रा.पं.कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इषारा इंडियन पॅंथर सेनेतर्फे उपविभागीय अधिकारी,उदगीर यांना जिल्हाध्यक्ष इतिहास कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
गुरांच्या बाजारासाठी देशात प्रसिद्ध असलेले हाळी व हंडरगुळी हे २ गाव आणि येथील बसस्थानक तसेच तिरुनदीवरील पुल व नदीचे पाञ नांदेड-बिदर मार्गावर आहे.
माञ,बसस्थानकाचे मैदान व हा पुल व नदीचे पाञ दुर्गंधीने बरबटलेले दिसते.
आणि याबाबत माध्यमातुन वेळोवेळी आवाज उठविला तसेच संबंधित अधिकारी महाशयाने या दुर्गंधीचे जाय मोक्यावर येऊन पाहणी ही केली. पण कारवाई माञ शुन्य.यामुळे पुलावर आणि नदीपाञात मांस व बीफ विक्रेते त्यांच्याकडील रक्त,हाडं,पंखं यासारखे वेस्टेज साहित्य तिरु नदीत आणि राज्यमार्गावर टाकतात.म्हणुन येथे सर्वदुर दुर्गंधी पसरलेली असते.आणि या घाणींचा ञास प्रवाशांसह वाहनधारकांना होत आहे.
म्हणुन याबाबत वेळोवेळी माध्यमातुन आवाज उठवला तरीही याकडे मतांमुळे ना हाळीची ग्रापं. लक्ष देते.ना हंडरगुळीची.यामुळे ही घाण या गावाची ओळख बनली आहे.म्हणुन ही घाण साफ करावी.अन्यथा ग्रा.पं.वर मोर्चा काढण्याचा इषारा इंडियन पॅंथर सेनेने दिला आहे.
ग्रामस्थांनी कर भरुन सहकार्य करावे.जेणेकरुन कररुपी जमलेल्या रकमेतून स्वच्छतेची कामे करता येतील.कारण,या शिवाय ग्रापं.कडे दुसरे कोणते इनकम नाही.तेंव्हा हाळीतील जनतेनी आपल्याकडील कराचा भरणा करावा.तसेच हाळी ग्रापं.हद्दीत असलेल्या बसस्थानकासमोर वेस्टेज मांस,बीफ आदी घाण टाकणा-यांना नोटीस देण्यात येईल.माञ,संबंधित तालुका व जिल्हास्तरीय यंञणेनी महामार्गावर वेस्टेज मांस व बीफचे तुकडे टाकणा-यांवर कारवाई करणे जास्त चांगले होईल.असे चंद्रशेखर बीडवई ग्राविअ.यांनी म्हटले आहे.


0 टिप्पण्या