Ticker

6/recent/ticker-posts

चेक्क नगर सेवकांनेच नगरपरिषद कार्यालयातच कचरा टाकुन केला संताप व्यक्त.

नगरपरिषद वरोरा येथील घटना


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : वरोरा शहरातील प्रभागातील नाल्यांची सफाई होत नसल्याचा आरोप करत सत्ताधारी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने शुक्रवारी (दि. ८) नगर परिषद कार्यालयात कचरा टाकून संताप व्यक्त केला. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता असून, प्रभाग सातचे नगरसेवक राज खंडारे हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. प्रभागातील नाल्यांच्या सफाईसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी नालीतील कचरा कार्यालयात आणून टाकला, नगरसेवक राज खंडारे यांनी पालिकेत  नालीतील कचरा फेकत आपला रोष व्यक्त केला.

ही घटना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने प्रशासनाच्या दिरंगाईविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे समजते. या घटनेमुळे नगर परिषदेच्या कामकाजातील समन्वय आणि सफाईच्या मुद्दावरून खळबळ उडाली आहे.

--------------- बॉक्स----------

 *नगरसेवक राज खंडारे यांनी वरोरा नगरपरिषदेच्या कामकाजावर आरोप करत प्रभागातील नाल्या सफाईसाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे  "प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी" हा मार्ग अवलंबला, असे ननगरसेवक राज खांडरे यांनी  स्पष्ट केले.*
-------------------------------
 *नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी स्पष्ट केले की नाल्यासफाईचे टेंडर पूर्ण झाले असून, पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण केली जातील असे स्पष्ट केले.*
---------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या