Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावतीत ड्रग्ज तस्करीवर मोठी कारवाई: 14.20 लाखांचा मुद्देमाल जप्त


पहाटे 2 वाजता गुन्हे अन्वेषण विभागाचा सापळा; नागपूरच्या आरोपीकडून 168 ग्रॅम ड्रग्ज हस्तगत


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर:भद्रावती मुख्य महामार्गावरून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे अन्वेषण विभाग, चंद्रपूरच्या पथकाने पहाटे धडक कारवाई करून अटक केली. आरोपीकडून 14 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

आज पहाटे सुमारे 2 वाजताच्या दरम्यान नागपूरहून भद्रावती मार्गे ड्रग्जची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली.
सदर माहितीच्या आधारे पथकाने भद्रावती मुख्य महामार्गावर सापळा रचून संशयित वाहनांवर लक्ष ठेवले. नागपूरकडून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाची तपासणी केली असता चालकाच्या ताब्यातून 168.94 ग्रॅम अमली पदार्थ आढळून आले.

या कारवाईत अमली पदार्थ 168.94 ग्रॅम, किंमत अंदाजे 8 लाख 50 हजार रुपये, चारचाकी वाहन व दोन मोबाईल फोन असा  एकूण मुद्देमाल 14 लाख 20 हजार रुपये जप्त करण्यात आले.

आरोपी अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार, वय 40 वर्षे, रा. तुकडोजी महाराज पुतळा परिसर, नागपूर याला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पुढील तपास अमली पदार्थांचा स्रोत व या मागची संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. 

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग, चंद्रपूरच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

-------------------------------------------------
भद्रावतीत ड्रग्ज माफियांना दणका!

पहाटे 2 वा. LCB चा सापळा. नागपूरच्या तस्कराकडून 168 ग्रॅम ड्रग्ज जप्त. गाडी व मोबाईलसह 14.20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. अब्दुल सिराज गफ्फार अटकेत. ड्रग्जचा स्रोत शोधणार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या