चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर :- महाराष्ट्र राज्य आंध्र तेलंगाना कर्नाटक राज्यातून ज्यांच्या विश्वासावर अतिशय गोरगरीब परिस्थितीतले आणि अतिशय सिरीयस असे पेशंट ज्यांच्याकडे येतात तीच चंबुले आज आरोग्य दुत ते देवदूत असा प्रवास करताना दिसत आहेत. गरीब असेल श्रीमंत असेल सर्वांसाठी समान वागणूक आणि न्याय देणारे हे डॉक्टर असाच एक किस्सा आठवला म्हणून सांगतो एक चार वर्षाची लहान मुलगी अंधारात पेटल्ल्यामुळे जळाली होती ती 70 टक्के जळाली होती मी त्यांना सांगितले की चेंबूर साहेबांकडे रेफर करा आणि हो डॉक्टर साहेबांनी त्याची मुलीचा जीव वाचवला अतिवृष्टीच्या काळामध्ये तर त्यांनी जे काही जखमी आहेत अति गंभीर आहेत त्यांच्यासाठी ओपीडी मोफत ठेवली होती अतिशय कठीण शस्त्रक्रिया त्यांनी करून दाखवल्या आणि हो त्या यशस्वी ही झाल्या त्यांना भेटण्यासाठी गेल्यास ते युवकांना निर्व्यसनी राहण्याचा व शिकून मोठ होण्याचा सल्ला देतात त्यांचं मार्गदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
मी माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत अनेक डॉक्टर पाहिलेत जे की पैसे भरल्याशिवाय पेशंटला डिस्चार्ज देत नाहीत पेशंट वारला तरी डेड बॉडी पैसे भरून घेतल्याशिवाय सोडत नाही पण इथे जरा वेगळ पाहायला मिळत साहेब सदा हसमुख असतात पैसे नाहीत ना तुमच्याकडे घाबरू नका.तुमचा हे बोलणं एखाद्या देवदूता सारख वाटत. साहेबांच्या अनेक गोष्टी सांगण्यासारखे आहे आपण डॉक्टरांना देव म्हणतो ना खरंच मी डॉक्टर चंभुले यांच्यामध्ये देव पाहिला आहे तोही मानव रुपी देव भरपूर काही लिहिण्यासारखं आहे पण शब्द कमी पडतील साहेब आपले कार्य आपली सेवा ही आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील ईश्वर आपणास बळ देत राहो उत्तम आरोग्य देवो व अशीच देशसेवा व समाज सेवा करण्याची ताकद देऊन समाजसेवेची व रुग्नेसेवेची ही जाण आपल्यातून प्रत्येकाला मिळो ही इच्छा..


0 टिप्पण्या