चित्रा न्युज प्रतिनिधी
मोर्शी -महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे 18रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून शिबीर संपन्न झाले.शिबिराचे उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आयोजित शिबिरात तब्बल 18सामान्य शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार ,सर्जन डॉ प्रविण बिजवे , व भुलतज्ञ डॉ. जगदीश काळभोर यांचे यांचे सहकार्य लाभले सदर शिबिर हे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार तसेच निवासी बाह्य संपर्कअधिकारी डॉक्टर संदिप हेडाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले तसेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील, वरूड व मोर्शी चे वैद्यकीय समन्वयक डॉ घनश्याम मानकर अर्जुन पोतदार श्रीमती रेशमा बहुरूपी, श्रीमती . मीनाक्षी मेश्राम,सोनाली डिकोंडवर, अकिंत नेवारे , स्मिता पकडे, रुपाली वैरागडे,सागर झटाले, प्रवीण कापडे, ज्ञानेश्वर टाकळे,नागोराव खडसे,शोभा इंगळे, संगिता तायवाडे महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना मधील वशीम शेख , प्रकाश पांडे,सर्व अधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या