पर्यावरण स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : बोपापूर, दि. ५ जून २०२६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मेरा युवा भारत (MY Bharat) चंद्रपूर , शिवछत्रपती युवा क्रीडा मंडळ बोपापूर आणि युथ सोशलग्राम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य समिती आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोपापुर यांच्या संयुक्त विद्यमाने ताडाळा-बोपापूर येथे स्वच्छता अभियान, पर्यावरण जनजागृती उपक्रम, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा तसेच दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.०० वाजता स्वच्छता अभियानाने झाली. गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. युवक, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छ आणि हरित गावाचा संदेश दिला.
यानंतर सकाळी ८.०० वाजता पर्यावरण जनजागृतीसाठी पर्यावरण पोस्टर स्पर्धा आणि पर्यावरण घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन, जलसंधारण व स्वच्छतेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीवेचे दर्शन घडले.
पर्यावरण पोस्टर व घोष वाक्यस्पर्धा विजेते :
प्रथम क्रमांक : मनस्वी वॄंदेश्वर गाडगे ,द्वितीय क्रमांक : वेदिका प्रकाश वांढरे तर
तृतीय क्रमांक : धनश्री नितेश गंधफाडे
त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या **गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागील पालक, शिक्षक आणि शाळेच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोपापुर गावच्या आरोग्य सेविका लिलाताई वासेकर,प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासक पुष्पाताई हिरादेवे, ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर कुत्तरमारे, पोलीस पाटील प्रतिक हिरादेवे, अंगणवाडी सेविका योगिता गाडगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवभाऊ मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सरिता कुत्तरमारे, अभियंता भूषण ढोके तसेच शिवछत्रपती युवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सतीश हिरादेवे ,गुरुदेव सेवा मंडळाचे ग्रामसेवाधिकारी रुपेश कुतरमारे तथा आजीवन अध्यक्ष विठ्ठल हिरादेवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे तथा गावातील ग्रामवासी यांनी पर्यावरण संरक्षण शपथ घेतली आणि अशी होती की पर्यावरणाचे संरक्षण करील, दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे ठिकाणी संगोपन करीन, प्लास्टिकचा वापर कमी करीन ,पाणी व ऊर्जा यांची बचत करीन आणि स्वच्छ हरित व सुंदर भारत घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील अशा प्रकारे
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, जलसंधारण आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज असून युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेरा युवा भारत, शिवछत्रपती युवा क्रीडा मंडळ बोपापूर, युथ सोशलग्राम फाउंडेशनचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि बोपापुर ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देतानाच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणारा हा उपक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरला. या जागतिक पर्यावरण दिनाचे सुत्रसंचालन शिव छत्रपती युवा क्रिडा मंडळाचे सचिव रुपेश कुतरमारे तर आभार प्रदर्शन जि. प. प्रा शाळा मुख्याध्यापक देवा भाऊ मेश्राम यांनी केले आणि हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


0 टिप्पण्या