Ticker

6/recent/ticker-posts

धांमत्री गावचा महाकाय घंटा आणि नागेश्वर मंदिराचा इतिहास


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती- वर्धा जिल्हयाला जोडणारी किंवा तोडणारी नदी म्हणजे वरदा नदी
तिवसा गावापासून पंधरा किलोमीटर दुर बसलेलं धामंत्री तिवसा तालुक्यातील शेवटचा गाव.धामंत्री नागमंदिराचा इतिहास जानकार वेगवेगळ्या पध्दतीने सांगतात. ईतिहास कालिन पौराणिक धाम म्हणजे मुख्य मंदिराचे गाव धामंत्री.नागेश्वर मंदिर 900 वर्षांपूर्वी अखंड खडकातुन  कोरण्यात आले हे धादांत खोटे आहे. मंदिराचे बांधकाम दगडापासून झाले असून उंच दगडी पायव्यावर मंदिर उभं आहे. नदीच्या पुरा पासुन बचाव व्हावा म्हणून मंदिराचा पायवा उंच आहे  
आर्वी तालुक्यातील  कोंडण्यपूर  मार्गावर नांदपुर गावात नदीकाठी  दोन मंदिरे आताही चांगल्या स्थितीत आहे. तेथून थोडं समोर गेले नांदपुर वरुन माटोडा बेनोडा या गावात पायदळी रस्त्यावर दगडांवर दगड रचलेले भव्य पुरातन मंदिर होते या मंदिराला लोक हेमाडपंथी मंदिर म्हणायचे------ 
माटोडा-बेनोडा गावा जवळील हे मंदिर 2020 साला पर्यंत अस्तित्वात होते. नंतर ते जिर्ण होवून पडले आता त्यावर गावकऱ्यांनी नवे मंदिर बांधले.हे मंदिर मी प्रत्येक्ष पाहिले. त्यामध्ये  शिवलिंग वगैरे काहीही नव्हते.ते मंदिर हिनयान पंथाची कलाकृती असावी. आपणं चित्रात पाहत आहो हे मंदीर धामंत्रीचे आहे. नादंपुर धामंत्री येथील सर्व मंदिर एकाच कालखंडात बांधले आहे.नांदपुर गावाच्या समोर नदीच्या पात्रात पुलाजवळ दोन छोटी छोटी मंदिरे दिसतात 
मंदीरातील शिल्पकृती ही हातोटी छननीने कोरली असुन इतिहासकार या मंदिराला देखील हेमाडपंथी मंदिर समजतात.पण हेमाडपंथ नेमका कोणता आहे. याचा उलगडा इतिहासकार स्पष्ट करीत नाही.विदर्भात अनेक ठिकाणी दगडी मंदिरे दिसतात हे सर्व मंदीर हेमाडपंथीच आहे-असा ठपका मारुन इतिहासकार मोकळे होतात. माझ्या मते हि बांधकाम शैली नागवंशीय  लोकाची आहे.---हेमाडपंथ जैन धर्माशी संबंधित असावा जैन समुदाय हा भगवान महावीराची उपासकांना करतो म्हणून तिथे महावीराची मुर्ती असायला पाहिजे पण कुठेच महावीराची मुर्ती दिसत नाही प्रत्येक मंदिरात गोलाकार स्तुप आकाराचे शिल्प आहे  अखंड दगडातुन मंदीरशिल्प स्तुप बुध्द विहार बुध्दमुर्ती कोरण्याची पंरपरा बौद्ध धर्मात पाहायला मिळते उदाहरणार्थ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुंफा लेण्या स्तुप शिलालेख बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत हा हिनयान बौध्द पंरपरेचा इतिहास असावा हिनयान पंथाचा प्रभाव कमी झाल्या नंतर यालाच अभ्यासकानी हेमाडपंथ असं नाव दिलं असावं- यावर संशोधन होणे गरजेचे आहे. धांमत्री येथील कोरीवकाम असलेल मंदिर 900 ते 1000 वर्ष जुने आहे. प्राचिन काळी हे मंदिर घनदाट जंगलात एकांत स्थळी बांधण्यात आले. तेव्हा धांमत्रीगाव अस्तित्वात नव्हते.नागमंदीरा पासुन दुर काही वर्षा नंतर धांमत्री गावं बसले-- म्हणजे नागनाथ मंदिर पुर्वीपासून आहे. तर धामंत्री गाव नंतर बसले. कोंडण्यपूर हे प्राचीन नगरी आहे. कोंडीन्य भंतेजी पासून कौंडण्यपूर हे नाव पडले.  हिनयान पंथी लोकांनीच नागेश्वर मंदिराची स्थापना केली असावी.  ऐतिहासिक नोंदीनुसार 1607 मध्ये नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पेशवाई मध्ये झाला.म्हणजे मंदीराचा कळस बांधकाम शिवलिंगाची निर्माती करण्यात आली. कोंडण्यपूर येथील भिमक राजा मुलीला रुख्मिणीला भुयारी मार्गे येथे दर्शनासाठी घेऊन जात होता अशी भ्रामककथा जोडलेली आहे. कौन्डिण्यपूर ते धामंत्री एवढे लांब भुयार अस्तित्वात नाही असते तर इतिहासकारांनी शोध घेतला असता म्हणून भुयार मार्गाची भ्रामककथा आहे.प्राचीन काळापासून नाग मंदिर होते हे सत्य आहे.नाग मंदिरातील महाकाय घंटा 1921 मध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरा म्हसळा गावातील जमीनदार पंजाबराव ढेपे पाटील यांनी दान केली.धंटा अष्टधातू पासून बनलेली असुन जवळपास 500 किलो वजनाची असावी. हि धंटा 1921 साली भेट दिली. आज या घंट्याला बसवून 105 वर्ष पूर्ण झाली.घंट्या विषयी दोन व्याख्यानिका आहे. ही घंटा कारागिरांनी धामंत्री गावात तयार केली कि मांजरी गावातच बनविण्यात आली. यामधील सत्य शोधले तर मला वाटते ही घंटा मांजरी गावातच तयार करण्यात आली नंतर बैलबंडीने धांमत्री गावात आणली-- नंतर दगडाचे घंटागृह उभारुन महाकाय घंटा टागण्यात आली. 
या घंट्याचा आवाज दोन किलोमीटर परिसरात जातो. 1990 च्या दशकात तिवसा परिसरातील खूंखार डाकू सरपन भोसले यांने ही घंटा चोरण्याचा प्रयत्न केला होता परंतु अवजड महाकाय वजनामुळे हि घंटा चोरता आली नाही. असो पण धामंत्री गावातील नाग मंदिर अत्यंत प्राचीन असून दरवर्षी लोक इथे श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला येतात आपली उपस्थिती दर्शवितात परंतु या मंदिरावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे तेव्हाच ऐतिहासिक सत्य बाहेरयेईल.
हेमाडपंथ नेमका काय प्रकार आहे.हे इतिहास तज्ञांनी स्पष्ट करावे.बौध्द धर्मातील हिनयान पंथी लोकांनी मंदिर बांधले असावे.ही सत्यता माझ्या लिहिण्यापूर्ती मर्यादित आहे.हा शोध नाही. 
परंतु इतिहासकारानी शोध घेवून सत्य इतिहास सांगायला पाहिजे. विदर्भातील अनेक प्राचीन मंदिराचे उत्खनन करून तज्ञांनी संशोधन करायला पाहिजे.

शब्दांकन-प्रा.डाॅ.रवि दलाल, तिवसा 
संकलन - विद्रोही अविनाश गोंडाणे अमरावती  9923264193

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या