Ticker

6/recent/ticker-posts

सागरा शमशान रोडवर 38 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू!

बोरगावच्या प्रशांत चौधरीचा मृतदेह बाईकसह निर्जनस्थळी; जुगार अड्ड्याचा संबंध? गावात तर्क-वितर्कांना उधाण

 चित्रा न्युज प्रतिनिधी
वरोरा : भद्रावती तालुक्यातील सागरा गावाजवळ शमशानभूमीच्या रस्त्यालगत 38 वर्षीय युवकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत युवकाचे नाव प्रशांत पंढरी चौधरी (रा. बोरगाव धांडे) असे असून तो सागरा येथे नेमका कशासाठी आला होता, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

निर्जन शमशान रोडवर प्रशांतचा मृतदेह आढळला. त्याची बाईक रस्त्याच्या कडेला उभी होती. घटनेची माहिती मिळताच शेगाव (बु.) पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

प्रशांतचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा घात आहे की अपघात, याबाबतचा नेमका उलगडा पोस्टमार्टम अहवालानंतरच होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सागरा परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनजवळ रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची चर्चा आहे. वरोरा व आजूबाजूच्या गावांमधून अनेक जण येथे जुगारासाठी येतात, अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्यामुळे या जुगार अड्ड्याचा आणि युवकाच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

मृतक प्रशांत चौधरी हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मात्र या घटनेनंतर गावात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, “घात की अपघात?” यावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

___________________________________

 शमशान रोडवर युवकाचा संशयास्पद मृत्यू!

भद्रावती तालुक्यातील सागरा गावाजवळ 38 वर्षीय प्रशांत चौधरीचा मृतदेह बाईकसह आढळला. बोरगाव धांडे येथील रहिवासी. घात की अपघात? पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा. गोडाऊनजवळील रात्रीच्या जुगार अड्ड्याचा संबंध? पोलिसांचा तपास सुरू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या