चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी : लाखनी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करत सुमारे 6 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा रेंगेपार/कोहळी परिसरात 17 जून रोजी पहाटे 1.10 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी वृषभ संजय कुंभरे (वय 22, रा. संजय नगर, लाखनी) हा आपल्या ताब्यातील आयशर 480 कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक MH-36/AL-1757) व लाल रंगाची विनानंबर ट्रॉलीद्वारे अंदाजे एक ब्रास शासकीय रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आला. तपासादरम्यान वाहनासंबंधी आवश्यक कागदपत्रे तसेच रेती वाहतुकीसाठी आवश्यक पास अथवा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा एकूण 6 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस हवालदार निलेश बालकदास रामटेके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 316/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305(ई) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक सा.पोलीस स्टेशन लाखणी आशिष गजभिय यांच्या मार्गदर्शना खाली कारवाई करण्यात आली. गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार रामकृष्ण बावनकुळे यांनी केली असून पुढील तपास सहायक फौजदार सुरेश आत्राम हे करीत आहेत.


0 टिप्पण्या