Ticker

6/recent/ticker-posts

फुटपाथ-पार्किंगवरील अतिक्रमण हटवा, दंडात्मक कारवाई थांबवा!

CPI चा नगर परिषदेला अल्टिमेटम; 15 दिवसांत कारवाई न झाल्यास प्रशासन जबाबदार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती: नगर परिषद क्षेत्रातील फुटपाथ व पार्किंगच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवून वाहतूक कोंडी, अपघात व पार्किंग समस्येचे निराकरण करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. अतिक्रमण न हटवता वाहनचालकांवर केली जाणारी दंडात्मक कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.

कॉम्रेड राजू गैनवार, माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव, यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगराध्यक्ष प्रफुल चटकी व ठाणेदार योगेश्वर पारधी यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, 
1.  बाजारपेठेत पार्किंगची सुविधा नसल्याने नागरिकांना वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात.
2.  यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता वाढत आहे.
3.  पार्किंगच्या जागेवरच अतिक्रमण असल्याने रस्त्यावर उभ्या वाहनांवर पोलिसांकडून दंड होतो, जो अन्यायकारक आहे.

नगर परिषदेने 15 दिवसांच्या आत प्रभावी कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटवावीत. तोपर्यंत वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करू नये, असे पत्र पोलीस विभागास द्यावे. अन्यथा वाहतूक कोंडी व अपघातांना संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

_______________________________

 प्रशासनाचे आश्वासन :
ठाणेदार योगेश्वर पारधी म्हणाले:

"चंद्रपूर-नागपूर रोडवरील पेट्रोल पंप चौकात ट्राफिक सिग्नल लावण्यासाठी कर्नाटक एमटा कोल माईन्स, बरांज यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. तो त्यांनी मान्य केला आहे. एक-दोन महिन्यात सिग्नल लागतील व चौकाचौकात ट्राफिक पोलीस तैनात करू."

नगराध्यक्ष प्रफुल चटकी म्हणाले:  

"आपला अर्ज सभागृहात ठेवून चर्चा करू टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवू. पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देऊ व नो पार्किंगचे बोर्ड लावू."

निवेदन देताना  कॉम्रेडचे शिष्टमंडळ कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन, कॉम्रेड सुनिल रामटेके, कॉम्रेड रवींद्र तराळे, कॉम्रेड शेख शकील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

_________________________________

अतिक्रमण हटवा, मगच दंड करा - CPI चा इशारा!
  
,भद्रावतीतील फुटपाथ-पार्किंगवरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी. CPI ने नगर परिषदेला 15 दिवसांचा अल्टिमेटम. ठाणेदार पारधी: 'पेट्रोल पंप चौकात 2 महिन्यात सिग्नल लागणार'. नगराध्यक्ष चटकी: 'टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवून पार्किंग व्यवस्था करू'. तोपर्यंत दंड नको, अशी मागणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या