चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा:-जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून दिनांक 7 जून 2026 रोजी भंडारा सायकल असो.भंडारा तर्फे आयोजित 10 की. मी.सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.सकाळी 6.00 वा. निघालेल्या या रॅलीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे एमआरपी मध्ये सुधारणा करण्याच्या आंदोलनामध्ये भंडारा शहर सायकल रॅलीमध्ये सहभाग घेण्यात आला. या रॅलीमध्ये शहरातील प्रतिष्ठित मंडळी, डॉक्टर्स ,विद्यार्थी ,महिला आणि सायकल प्रेमी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होते .ही सायकल रॅली खात रोड येथील रेल्वे ग्राउंड येथून निघून खात रोड केशवनगर, परत लालबहादूर शास्त्री चौक, गांधी चौक ,नंतर राजीव गांधी चौक आणि शीतला माता मंदिर रोडने परत रेल्वे ग्राउंड वर पोहोचली .
अशाप्रकारे ही सायकल रॅली यशस्वी झाली. ह्या रॅलीमधील उपस्थितांना मा.श्री नितीनजी काकडे, पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री दिल्ली यांनी एमआरपी मध्ये असलेले दोष आणि त्याबाबत सरकारकडे एमआरपी मध्ये योग्य त्या सुधारणा करण्यासाठी जंतर-मंतर दिल्ली येथे दिनांक 12 जून 2026 रोजी आंदोलन छेडलेले आहे आणि यात केंद्र शासनाने एमआरपी मध्ये आवश्यक ते बदल करावेत याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या आंदोलनाला उपस्थित सर्व नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आणि ही मागणी अतिशय न्याय आणि योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जनजागृती करण्याच्या दृष्टीने उपस्थित सर्व ग्राहकांना एमआरपीबाबतचे आंदोलन विषयी परिपत्रके वाटण्यात आलीत आणि त्यांची संमती असल्याने स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबविण्यातआली. या रॅलीमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे श्री चंद्रशेखर साठे , सौ नीलिमा साठे,श्री संजय आयलवार ,श्री जयंत सब्जीवाले ,श्री राजेश पांडे, श्री अनिल शेंडे, श्री प्रकाश कुरोडे, श्री कृष्णा खेडीकर, श्री रवींद्र तायडे ,श्री लोकेश मोहबंसी,डॉ.प्रदीप मेघरे ,डॉ यशवंत लांजेवार इत्यादी मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या