Ticker

6/recent/ticker-posts

कमांडो ग्रुप (गोपीवाडा) चा भव्य वार्षिक योग सेमिनार उत्साहात संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-मुख्य योग शिक्षक चंद्रशेखर डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ७ दिवसीय भव्य योग सेमिनारचा यशस्वी समारोप झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र मेटल इंडस्ट्रीजचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट टी. एन. मूर्ती उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस कॉलेज, शाहपूरचे संचालक श्री नरेंद्र पालंदूरकर यांनी उपस्थिती दर्शवली.
विशेष अतिथी म्हणून बॉम्ब स्क्वॉड भंडारा पोलीस विभागाचे प्रभारी पीएसआय मनोहर गभने, सरपंच विनायक टांगले, पंचायत समिती सदस्य संजय बोंद्रे, शाहपूरच्या सरपंच मंगला देवगडे, जिल्हा परिषद सदस्या आशा डोरले, ग्रीन हेरिटेज संस्थेचे संस्थापक सईद शेख, माजी सैनिक रामचंद्र कारेमोरे, अनिल भोंगाडे, प्रहरी बहुउद्देशीय संस्था गोपीवाडाचे अध्यक्ष योगेश गहाणे, तसेच महाराष्ट्र मेटल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक राकेश वाघाये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना कैलाश झंझाळ यांनी केले.
कमांडो ग्रुपतर्फे दरवर्षी गोपीवाडा येथे महाराष्ट्र मेटल इंडस्ट्रीजच्या सहकार्याने भव्य योग महोत्सवाचे आयोजन केले जाते. या सेमिनारच्या आयोजनामध्ये कमांडो ग्रुपचे संस्थापक, माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर डोळस यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यांचा उद्देश ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ अंतर्गत “हर घर योग, घर-घर योग, करा योग, रहा निरोग” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व बालकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे, वही, मग आदी वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये गोपीवाडा तसेच परिसरातील गावांतील मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या