चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची यावर्षीची महामंडळाची सभा दि. ११ जूनरोजी राळेगणसिध्दी होणार आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात तात्या ,शिक्षक प्रिय बाळासाहेब मारणे यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबुराव माडगे यांनी दिली.
राळेगणसिध्दी येथील स्वर्ग लॉन्स येथे सकाळी दहा वाजता सभा सुरू होणार आहे. जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार मार्गदर्शन करणार देशभरातील विद्यार्थी आणि शिक्षक प्रचंड अस्वस्थ आहेत. शिक्षणविरोधी धोरणांनी थैमान मांडले आहे. टी. ई. टी. पदोन्नती, संच मान्यता, इडज, ऑनलाइन कामे, गैरसोयीच्या बदल्या, रिक्त पदे, यांसारख्या अनेक समस्यांनी राज्यभरातील सरकारी शाळांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. लोकशाही मार्गाने अर्ज, निवेदने, आंदोलने करूनही शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने समाजसेवक अण्णा हजारे व पोपटराव पवार यांच्या माध्यमातून सरकारमध्ये जागृती करण्यासाठी, शिक्षक आंदोलनाची व सर्वोच्च न्यायालयातील लढ्याची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी या महामंडळ सभेचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबुराव माडगे यांनी दिली.


0 टिप्पण्या