Ticker

6/recent/ticker-posts

वन विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-मौजा गिरोला जपानी येथील गट नंबर १६० मधील सागवान व आडजात वृक्ष तोडीचा मुद्दा रेटून धरण्यात आला असतांनाही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तक्रारदार युवराज पर्वते वन समिती अध्यक्ष यांनी केला आहे.  वन विभागाकडे कास्तकार यादव पर्वते यांनी 11 नोव्हेंबर 2025 रोजी झाडे कापण्याची अनुमती मिळण्याकरिता आर. ओ. कार्यालयात अर्ज सादर केला. नियमानुसार सदर प्रकरण आवश्यक कागदपत्रसहित आर. एफ. ओ. यांचेकडे वर्ग झाले. कागदपत्रांची तपासणी करूनच 4 जानेवारी 2026 रोजी आर. ओ. व फॉरेस्ट गार्ड यांचे समक्ष उभ्या झाडांचा पंचनामा करण्यात आला. रितसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून झाडे तोडण्याची अनुमती आर. एफ. ओ. यांनी दिली. अनुमतीने लाकूड ठेकेदार व कास्तकार यांनी सदर सागवान व आडजात 87 झाडे दि.10 व 11 मे 2026 रोजी कापून परस्पर उचलून दुसरीकडे अंदाजे 1 किमी अंतरावर नेऊन ठेवले. सदर कार्यवाही वनविभागाचे अधिकारी यांचे परवानगीनेच झाली असा जबरदस्त केलेला आहे.              
तक्रारदार यांनी 14 मे 2026 रोजी तक्रार दाखल केली. 15 मे रोजी प्रत्यक्षात वनविभागाचे कार्यालयात जाऊन भेट घेतली. प्रकरण अंगलट आल्याचे लक्षात येताच वनविभागाचे अधिकारी यांनी ठेकेदार व कास्तकार यांना दि.14 मे 2026 रोजी काहीही करा परंतु तक्रारदार यांना गोड बोलून आमिष दाखवून प्रकरण थांबवा असे सांगितले. त्यानुसार ठेकेदार संजय बडवाईक हे आपल्या दिवाणजी सोबत तक्रारदार यांचे घरी स्टँप पेपर घेऊन गेले. आपण बसून प्रकरण थांबऊ 27 हजार रुपये तुम्हाला देतो. असे आमिष दिले. तक्रारदार यांनी स्पष्ट नकार दिला. अर्जदार यादव पर्वते यांचेवर दबाव टाकून सदर झाडे मी स्वतः कापली आहेत असे वनविभागाचे अधिकारी यांनी लिहून मागितले. वनविभागाला स्वतःचे कामगिरीचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होतो. वनविभागाने कास्तकार यांचे कडून 14 मे रोजी संमती पत्र लिहून मागितले. त्यामध्ये 4 व्यक्तींच्या खोट्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत असा दावा युवराज पर्वती यांनी केलेला आहे. 21 मे रोजी झाडे तोडण्याची अनुमती नाकारण्याचे पत्र वॉटसअप वरून दिले. एकीकडे वनविभागाचे अधिकारी सदर झाडे कास्तकार यांनी तोडले आहेत असे सांगतात. त्यांचेकडे वृक्ष तोडीचा परवाना करिता प्रकरण आलेच नाही तर वृक्ष तोडल्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र कशाचे आधारे आर. एफ. ओ. नितेश धनविजय यांनी दिले. माहिती अधिकारात मागितलेल्या कागद पत्रात 14 मे रोजीचे संमती पत्र दिले. 14 मे 2026 रोजी कास्तकार यांचेकडून संमती पत्र मागविण्यासाठी आर. एफ. ओ. धनविजय तक्रारदार युवराज पर्वते यांच्या तक्रारीची वाट पाहत होते काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. आर. एफ. ओ. धनविजय यांचेकडे प्रकरण आलेच नाही. झाडे स्वतः कास्तकाराने कापले. तर 14 मे 2026 रोजीचे संमती पत्र व वृक्ष तोडल्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे वॉटसअप वरून पत्र आर. एफ. ओ. धनविजय यांनी झोपेत असताना दिले काय असा आरोप तक्रारदार युवराज पर्वते यांनी केला आहे. सी. सी. एफ. गुरुप्रसाद नागपूर यांनी 2 जून 2026 रोजी तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. जबाबदार अधिकारी यांनी आपल्या कर्मचारी यांना पाठीशी घालून कारवाही केली नाही असा आरोप तक्रारदार युवराज पर्वते यांनी केला आहे.     
दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन वरून प्रतिसाद दिला नाही. आर. ओ. राज मेश्राम यांचे कार्यालयात माहिती अधिकारी अंतर्गत माहिती करिता अर्ज दाखल केला असता माहिती अधिकाराचे पत्र घेण्याचा अधिकारी मला नाही असे सांगितले. आर. ओ. राज मेश्राम यांना त्यांचे कार्यालयाचे जन माहिती अधिकारी ते स्वतः असल्याचा विसर पडला असावा असे वाटत आहे. अन्यथा संबंधित अधिकारी यांचे विरोधात एल्गार उभारला जाईल अशी भूमिका तक्रारदार  युवराज पर्वते यांनी घेत लेली आहे. वनविभागाचे अधिकारी यांनी सदर प्रकरणाची दखल न घेतल्यास पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तक्रारदार यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या