Ticker

6/recent/ticker-posts

मंगेश नासरे ITI करून बनला तरुणांसाठी दीपस्तंभ

 रवि भोंगाने चित्रा न्युज 
साकोली: -मंगेश रमेश नासरे याने सतत केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्टाने आज घवघवीत यश प्राप्त केले आहे. वडिलांचा भाजीपाला विक्रीचा छोटासा व्यवसाय असताना मंगेशने वडिलांना त्यांच्या कामात मदत करत शिक्षण घेतले आणि जिद्द केली की एकदिवस स्वतःचा व्यवसाय सुद्धा करेन. त्याला याचा मार्ग दिसला जेव्हा त्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे COPA या व्यवसायाला २०१५-२०१६  मधे प्रवेश घेतला. संस्थेत त्याला शिल्प निदेशक एस. आर. आठवले यांनी संगणकाची तांत्रिक कौशल्य शिकविली. अंगी असलेली जिद्द आणि घेतलेले तांत्रिक कौशल्य याच्या जोरावर मंगेश ने २०१७-२०१८ मधे SAIL INDIA मध्ये शिकवू उमेदवारी पूर्ण केली. लगेच २०१८ मधे स्वतःचा एक छोटासा net cafe बल्लारपूर मध्ये सुरू केला आणि बघता बघता त्याने २०२० पर्यंत सेतू केंद्र सुविधा सुरू केले, पंजाब नॅशनल बँकेचे सुविधा केंद्र सुरू केले. यामध्ये त्याचा लहान भाऊ दिनेश नासरे याची सुद्धा त्याला मोलाची सोबत मिळाली. आज मंगेश हा Triveni Transports and Logistics Pvt Ltd मधे EDP Manager म्हणून काम करतो सोबतच त्याचे सेतू केंद्र सुविधा केंद्र ही चालवितो. बल्लारपूर सारख्या छोट्याशा तालुक्यात मंगेशने तांत्रिक प्रशिक्षण व जिद्दीच्या जोरावर तरुणांमध्ये एक आगळेवेगळे उदाहरण घालून दिले आहे. या सर्व संघर्षात त्याला त्याचे आई वडील व लहान भाऊ यांची सदैव खंबीर साथ मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या