चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-जागतिक योग दिन निमित्त योग भारती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने योग प्रशिक्षण शिबीरचे दि:16 जून रोजी शिवार्पण टॉवर राजीव गांधी चौक भंडारा येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडले.शिबिराचे उद्घाटन श्री उद्धव डोरले संचालक भंडारा अर्बन को _आप बैंक ली. भंडारा यांचे हस्ते श्री संजय एकापुरे अध्यक्ष विश्व हिंदू परिषद भंडारा,यांचे अध्यक्षतेखाली ,श्री रुपेश टांगले युवा कंत्राटदार, योग प्रशिक्षक श्री मारोती पुडके, डॉ. सौ.माधुरी बोधनकर, प्रमुख योग शिक्षक श्री शाम कुकडे तथा अध्यक्ष योग भारती संस्था, पियुष कुरंजेकर डॉ. रेणुका तिवारी, सईद शेख इत्यादी मान्यवर पाहुण्यांचे उपस्थितीत उत्साहाने पार पडले. उद्घाटन सोहोळ्यात श्री संजय एकापुरे यांनी गौ माता संरक्षण, सामाजिक समरसता व योग या विषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योग भारती संस्थेचे उपाध्यक्ष श्री अतुल वर्मा यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम वैद्य यांनी केले. अल्पोपाहार ने उद्घाटन कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.
योग भारती बहु.संस्था व अविशा इंटरप्राइजेस व पतंजली चिकित्सालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग दिवस 21 जून 2026 दीना निमित्त 16 जून ते 21 जून पर्यंत सहा दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून योग प्राणायाम वर श्री शाम कुकडे,16 जून, योग व मानसिक रोग व उपचार वर डॉ.रत्नाकर बांडेबुचे यांनी 17 जून ला योग्य मार्गदर्शन केले तर डॉ.अमृता सोनकुसरे यांचे 18 जून रोजी ज्येष्ठ नागरिकांची जीवनशैली, डॉ रेणुका तिवारी यांचे 19 जून रोजी आहार व दिनचर्या, डॉ धनंजय गभने यांचे 20 जून ला मन करारे प्रसन्न इत्यादी विषयांवर सकाळी 6.30 ते 7.30 पर्यंत व्याख्यान व मार्गदर्शन करण्यात येणार आहे,करिता सदर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन योग भारती बहु.संस्थे तर्फे करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चिंधुजी बूधे ,विठ्ठल सेलोंकर,अनिल शेंडे, आत्माराम बेदरकर ,संजय मोहतुरे ,पुरुषोत्तम समरीत,प्रभुदास मडावी,इत्यादीं नी सहकार्य केले.


0 टिप्पण्या