Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक योग दिन उत्साहात साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोपापूर (ताडाळा) येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दादाभाऊ मेश्राम यांनी योग शिक्षक म्हणून मार्गदर्शन करत विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले तसेच नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. उपस्थितांनी विविध योगासनांचा सराव करून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोपापूर, मेरा युवा भारत (MY Bharat) चंद्रपूर, सलग्नित शिवछत्रपती युवा क्रीडा मंडळ, बोपापूर आणि युथ सोशलग्राम फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व सहभागी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या