Ticker

6/recent/ticker-posts

अतनूर आरोग्य केंद्रात योग दिन उत्साहात साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
जळकोट :-येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरोग्य केंद्राच्या प्रांगणात विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ.सकलेन शेख उपस्थित होते.
यावेळी डॉ.शेख यांनी योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य, योगाचे महत्त्व उपस्थित नागरिक, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, आरोग्य मित्र, आरोग्य दूत व विद्यार्थ्यांना सुदृढ राहण्यास मदत होते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांसह सर्वांना दिला. तसेच यांनी विविध योगासने व प्रात्यक्षिके उपस्थितांनाकडून करून घेतली.
या कार्यक्रमात आरोग्य कर्मचारी वृंद, आशा कार्यकर्ती, आरोग्य मित्र, आरोग्य दूत, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांना ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, पद्मासन यांसारख्या योगासनांसह सूर्यनमस्कार आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य निरीक्षक सलमान शेख यांनी केले. योग दिनाचे महत्त्व व इतिहास याविषयीची माहिती मानसेवी आरोग्यमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, व्यसनमुक्ती चळवळीचे आरोग्यदूत बी.जी.शिंदे यांनी उपस्थितांना दिली. आभार वरिष्ठ लिपीक रोखपाल पांडुरंग सुर्यवंशी यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. योग दिनाचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी व आरोग्यवर्धक ठरला. योगासने डॉ.सकलेन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सह्ययिका प्रेमिला म्हेत्रे, रोखपाल पांडुरंग सुर्यवंशी, आरोग्य सहायक बालाजी सोनटक्के, आरोग्य निरीक्षक शेख सलमान, फार्मसिस्ट गजानन तोंडारे, जीएनएम लक्ष्मी मेंढे, दीपा मांगीलवार, आरोग्यदुत, आरोग्य मानसेवीमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, आशा कार्यकर्ती अध्यक्षा ज्योती गायकवाड, पत्रकार संजय शिंदे अतनूरकर, पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर सर्व आशा कार्यकर्ती, मदतनीस, आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या