चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-येथील नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेता संदीपभाऊ बावनकुळे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि प्रयत्नांना मोठे यश आले आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या भागात गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात आले आहेत. पीडब्ल्यूडी प्रशासनाने या कामाची तातडीने दखल घेतल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रभाग ५ मधील मुख्य रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेकदा वाहने अतिवेगाने धावत असल्यामुळे येथे लहान मुले, वृद्ध आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता व अपघातांची दाट शक्यता वर्तवली जात होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक संदीपभाऊ बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, साकोली यांच्याकडे प्रत्यक्ष भेट देऊन लेखी निवेदन सादर केले होते व सदर ठिकाणी तातडीने गतिरोधक लावण्याची आग्रही मागणी केली होती.


0 टिप्पण्या