चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमरावतीच्या सभागृहात पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग अमरावती जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती आणि संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरावती यांच्या वतीने नुकतेच विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार मा. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथे `ज्येष्ठ नागरिक कक्ष` स्थापन करण्यासाठी मा. कुलगुरू साहेब यांना दिलेल्या पत्राबद्दल बच्चुभाऊंनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल मंडळाने आभार व्यक्त केले.
तसेच फेस्काम तर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रस्तावित मागण्यांचे निवेदन बच्चुभाऊंना देण्यात आले. या निवेदनातील मागण्या विधान परिषदेच्या आगामी अधिवेशनात मांडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांनी दिले.तसेच संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू याना दुरध्वनी करून ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापनेबाबत विचारना केली. त्यावर लवकरच कार्यवाही करण्याची कुलगुरू यांनी शाश्वती दिली. याकरिता प्राचार्य धोटे सर, प्राचार्य सुभाष गवई सर व श्री गजेंद्र ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाप्रसंगी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे प्रादेशिक अध्यक्ष व राष्ट्रीय सहसचिव श्री पुरुषोत्तम गावंडे, आर. आर. लाहोटी सायन्स कॉलेज मोर्शीचे माजी प्राचार्य व ज्येष्ठ नागरिक संघाचे मुख्य मार्गदर्शक प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, समन्वय समितीचे अध्यक्ष व मंडळाचे उपाध्यक्ष कामगार नेते दामोदर पवार, सचिव डॉ. चंदनसिंह राजपूत, कोषाध्यक्ष ग्रामगीताचार्य धनराज निपाणे, ईंजि. संजय खोंडे, गजेंद्र पाथरे, मधुकरराव भोपाळे यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.याकरिता श्री.गजेंन्द्र ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


0 टिप्पण्या