पोलीस स्टेशन तुमसरची कामगिरी
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा:-दि.२०/०६/२०२६ रोजी ऑल आउट ऑपरेशन दरम्याण मा. सुभाष बारसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुमसर, पो. उपनि. प्रविन सयाम, पोउपनि प्रितम येवले व पोलीस स्टॉपसह पो.स्टे. परीसरात पेट्रोलिंग करीता असता गुप्त बातमिदार कडुन बातमी मिळाली की, मौजा. पवणारा येथे अवैधरित्या चोरटी रेती वाहतुक सुरू आहे. अश्या बातमिवरून दोन पंच समक्ष सापळा रचला असता मौजा. पवनारा फाटा येथे तिन रेतीने भरलेले ट्रक्टर मिळुन आले तिन्ही ट्रक्टर चालक/मालक नामे. १) रोहन शामा वाघाडे वय २० वर्ष, रा. गर्रा (बघेडा) २) निखील राजेश पटले वय २७ वर्ष, रा. बघेडा ३) पिक्की खुशाल वाघडे वय २१ वर्ष रा.मिटेवाणी ४) शुभम रोशन पटले वय २८ वर्ष रा. मिटेवाणी ५) अक्षय शिवचरण कटरे वय २८ वर्ष रा.येरली यांचे कडुन एकुण कि. २२,२१,०००/- रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
सदर संपुर्ण कार्यवाही मा. नूरूल हसन, पोलीस अधिक्षक भंडारा तसेच मा. निलेश मोरे अप्पर पोलीस अधिक्षक, मा. मयंक माधव सहाय्यक पोलीस अधिक्षक सा. उपविभाग तुमसर, मा. सुभाष बारसे पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, पोलीस स्टेशन, तुमसर, यांचे मार्गदर्शनात पो. उपनि. प्रविन सयाम, पोउपनि प्रितम येवले पो.ना. गणेश मन्नाडे/१२८१, पो.शि. विजय दमाहे/८३, पो.शि. अभिषेक घोडमारे/१२८२ पो.स्टे. तुमसर यांनी पार पाडली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि. येवले, पोउपनि सयाम पो.स्टे. तुमसर करीत आहेत.


0 टिप्पण्या