Ticker

6/recent/ticker-posts

पालोरा ( चौ.) येथे शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

सुपर फॉस्फेटयुक्त खत वापरण्याचे उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांचे आवाहन

चित्रा न्युज प्रतिनिधी
पवनी - तालुका कृषी अधिकारी कार्यालय पवनी आणि प्रकल्प (आत्मा) भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका बिज गुणन केंद्र पालोरा ( चौ.) येथे (ता.12/6) ला शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न झाला.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्मा   भंडारा च्या प्रकल्प संचालक उर्मिला चिखले ह्या होत्या.प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे,प्रगतीशील शेतकरी पुंडलिक घार, नरेंद्र आयतुलवार, अनिल ब्राम्हणकर,अजय शहारे,सागर कृषी अवजार केंद्र चिमूरचे संचालक महेंद्र खिरडकर,कोंढा मंडळ अधिकारी विजय हुमणे,पवनी मंडळ अधिकारी दिनेश काटेखाये आदी मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष उर्मिला चिखले  यांचे हस्ते तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वसंतरव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

 कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना उपविभागीय कृषी अधिकारी श्री.गिदमारे म्हणाले की,पर्जन्याचा विचार करता 120 ते 130 दिवस कालावधीचे बियाणे वापरावे. रोपांची लावणी ही जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत होने गरजेचे आहे.खत वापरतांना सुपर फॉस्फेटयुक्त खत वापरावे.त्याचप्रमाणे खताच्या पहिल्या मात्रेमध्ये पोटॅशयुक्त खताचा वापर करावा.त्यामुळे पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढते.तसेच किड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

डी. एस.आर.पद्धतीने पेरणी केल्यास पिकाचे उत्पादन काही प्रमाणात कमी आले तरी उत्पादन खर्च कमी येत असतो.शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात हिरवळीच्या खताचा वापर करावा.कृषी केंद्राचे संचालक खत आणि इतर औषधी विक्री करतांना एम.आर.पी.पेक्षा अधिक पैसे घेत असतील तर शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी असे आवाहन सुद्धा अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना आत्माच्या प्रकल्प संचालक उर्मिला चिखले यांनी केले.

 कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कोंढा विभागाच्या उप कृषी अधिकारी भूमेश्वरी येरणे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार सहाय्यक कृषी अधिकारी पी.बी.खेकारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषी विभागाचे सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या