चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडारा चे सन्माननीय अध्यक्ष व जिल्हाधिकारी सावंत कुमार, सचिव डॉक्टर नितीन तुरसकर यांचे निदर्शनानुसार,,, वरठी,तालुका मोहाडी, जिल्हा, भंडारा येथील आगग्रस्त श्री. प्रज्वल राजू हरकंडे व श्री. मुकेश गजानन गोखले यांचे घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.
मानवीयतेच्या हेतूने इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, भंडाराचे वतीने आगग्रस्त पीडीत कुटुंबीयांना ग्रामपंचायत सरपंच वरठी श्री. चांगदेव रघुते यांचे उपस्थितीत मदत साहित्य किट चे वाटप ( ब्लॅंकेट, किचन सेट,हायजिन किट, टॉवेल, तिरपाल इत्यादी ) करण्यात आले.
याप्रसंगी रेड क्रॉस चे रक्तरत्न प्रीतमकुमार राजाभोज,कोषाध्यक्ष हेमंत चंदवासकर, ज्येष्ठ महिला सदस्य श्रीमती मीरा भट्ट,डॉक्टर रुद्रसिन भजनकर, राजू खवसकर,रविशंकर साकोरे व आचंल मेश्राम इत्यादी हजर होते.


0 टिप्पण्या