Ticker

6/recent/ticker-posts

सुप्रसिद्ध सुत्रसंचालक, ज्ञान प्रबोधिनी क्षिप्रा मानकर यांना शिवसमान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक मंडळाकडून आनंददायी सत्कार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 अमरावती:-ज्ञान, संवाद, कौशल्य आणि समाजप्रबोधन यांचा प्रभावी संगम म्हणजे  खरे नेतृत्व या विचारांना कार्यातून साकार करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सौ क्षिप्रा मानकर.  शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या लाडक्या व लोकप्रिय पहिल्या महिला  उपमुख्यमंत्री मा.ना.श्रीमती सुमित्राताई अजितदादा पवार महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते लाल महाल पुणे येथे अखिल भारतीय शिव महोत्सव समिती तर्फे शिव सन्मान पुरस्कार  देवुन सन्मानित करण्यात आले. ही अमरावतीकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे. याचे औचित्य साधुन "अमरावती प्रादेशिक व संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ अमरावती, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्व्यय समितीचे पदाधिकारी मंडळीने सौ क्षिप्रा मानकर यांचे शिवनेरी या निवासस्थानी जावुन शाल,गुलाबफुलाचा भव्य गुच्छ व गौरवचिन्ह देवुन आनंददायी सत्कार केला. 
याप्रसंगी  क्षिप्राचे  प्रिय गुरू माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, समन्वय समितीचे अध्यक्ष दामोदर पवार , सचिव डॉ. चंदनसिंह राजपूत, प्राचार्य दादाराव दाभाडे ,माजी सचिव प्रभाकरराव उमक, ईजि. संजय खोडे,  सुप्रसिद्ध योग शिक्षिका सौ नीताताई खोंडे ,माजी मुख्याध्यापक तथा सचिव गजेंद्र पाथरे , ख्यातनाम लेखिका,कवि व साहित्यिक मुख्याध्यापिका सौ छायाताई पाथरे, मंडळाचे कोणत्याही कार्यात अग्रेसर असलेले  सेवाभावी व्यक्तीमत्व अनिलराव  वानखडे व मधुकरराव भोपाळे हे उपस्थित होते . 
सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना गावंडे साहेब म्हणाले. अमरावतीची सुकन्या सौ क्षिप्रा ने प्रतिकुल परिस्थिती स्वतःचे पायावर उभे राहून राज्य शासनाचेच नव्हे तर केंद्र शासनाच्या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन करून व्याख्यानातून जनजागृती, लेखणीतून विचार मांडण्याचे उत्कृष्ट कार्य केले.   तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.  उत्कृष्ठ सूत्रसंचालनामधुन अनेक पुरस्कार प्राप्त केले हि अभिमानाची बाब आहे.   ज्येष्ठ निवेदिका, समुपदेशक व समाजप्रबोधनकार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पवित्र मुहूर्तावर, पुणे येथील लाल महाल येथे आयोजित भव्य सोहळ्यात आपणास प्रतिष्ठेचा 'शिवसन्मान' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले, ही अत्यंत अभिमानाची  बाब असल्याचे सांगितले . 
प्राचार्य दिलीपसिंह खांबरे यांनी सांगितले की  श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आर आर लाहोटी  सायन्स कॉलेज मोर्शी ला मी प्राचार्य असतांना क्षिप्रा विद्यार्थीनी होती.  तिचे आईवडील एकटीला बाहेर कोठे जावु द्यायचे नाही. ती खुप हुशार असल्याने तिला स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मोर्शी येथुन बाहेर जाण्यासाठी तिचे सोबत एक महिला शिक्षिका द्यावी लागे. स्पर्धेत तिला अनेक प्रथम क्रमांकाचे  पुरस्कार मिळाले. त्यामुळे काॅलेजचे नाव उज्वल झाले. 
 तिचे ज्ञान, प्रभावी निवेदन, कौशल्य आणि समाजप्रबोधन यांचा सुरेख संगम  तिने साधला आहे. शिक्षण, पत्रकारिता, जनसंपर्क, समुपदेशन या सर्व क्षेत्रांत  केलेले कार्य, 'सावली समुपदेशन केंद्र' व 'स्नेहसावली प्रतिष्ठान'च्या माध्यमातून उभारलेला संवेदनशील आधार, तसेच 'इतिहास बहुजन महानायिकांचा' सारख्या ग्रंथ संपादनातून समाजाला दिलेली दिशा हे सर्व अमरावतीसाठी भूषण असल्याचे त्यांनी सांगितले.
समन्वय समितीचे अध्यक्ष श्री पवार यांनी सांगितले कि, क्षिप्रा ताईने प्रतिकुल परिस्थितीत स्वताला सावरुन जिद्द, चिकाटी व सतत चे प्रयत्नाने उच्च शिखर गाठले आहे. सामाजिक शैक्षणिक साहित्यिक आणि प्रबोदनानात्मक कार्यामध्ये अनेक पुरस्कार प्राप्त केले. महाराष्ट्रातील प्रेरणादायी व्यक्ती म्हणून त्यांची जनसामान्यांमध्ये ओळख आहे हे सर्व करीत असताना सामाजिक कार्यासोबतच कुटुंबाकडे सुद्धा लक्ष देऊन जिजामातेने  जसे छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले  तसेच क्षिप्राताईंनी आपल्या शिवबाला घडविले आहे. हा बहुमान आहे. भविष्यातील त्यांची स्वप्ने पुर्ण होवोत अशा शुभेच्छा दिल्या. प्रभाकरराव उमप यांनी सांगितले की मला  पहिल्यांदाच एवढ्या उच्च कोटीच्या महिलेचा सत्कार करण्याचा योग आला त्याचा सत्कार करताना खूप आनंद होतो असल्याचे मत व्यक्त केले.  श्री गजेंद्र पाथरे यांनी क्षिप्राताईची कार्याचा गौरव केला व भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सौ. छायाताई व निताताईंनी सुद्धा त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. क्षिप्राताईंनी सत्काराला उत्तर देताना म्हटले की आपण सर्व ज्येष्ठ  मंडळी माझ्या शिवनेरी निवासस्थानी येऊन माझा  सत्कार केला मी भारावून गेली. खरोखर आपण सर्व वडीलधारी मंडळी असल्याने मला माझ्या वडिलांची आठवण होते. मला घडविण्यामध्ये  माझ्या वडिलांचा व माझे गुरु खांबरे सरांचा  सिंहाचा वाटा आहे मी आज जे घडले आणि मला आंतरराष्ट्रीय स्तरावर  नावलौकिक मिळाले हे सर्व श्रेय यांचेच आहे. कौटुंबिक जीवनामध्ये अनेक घडामोडी झाल्या. खूप त्रास सहन करावा लागला. जुन्या आठवणी काढताना त्यांना गहिवरून आले. परंतु एवढ्या मोठ्या कठीण प्रसंगातून मी तर सावरलेच पण मी माझ्या शिवबाला घडवु शकले याचा अभिमान असल्याचे  त्यांनी सांगितले.    शेवटी शिवसन्मान' पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करुन  पुढील कार्यासाठी  मनःपुर्वकशुभेच्छा दिल्या. त्यानंतर आनंददायी छोटेखानी  कार्यक्रमाची सांगता झाली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या