Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी घेतल्या प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या भेटी



राजेश येसेकर चित्रा न्युज 
भद्रावती : शिलभद्र मंडळ तर्फे अशोका बुद्ध विहारात मुलांसाठी मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात आयएएस, आयपीएस, प्रशासकीय अधिकारी तसेच डॉक्टर, चित्रकार तर कोणाला संशोधक व्हायचे आहे. अशी दृढ संकल्पना केली होती. त्यांना याचा अनुभव घेता आला पाहिजे यासाठी प्रवीण चिमुरकर, अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी पुढाकार घेवून तालुक्यातील विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन मुलांच्या भेटी घडवून दिल्या. यात शहरातील तहसिलदार, मुख्याधिकारी, ठाणेदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, डॉक्टर तसेच पाणी शुद्धीकरण प्लांट आणि घनकचरा प्रकल्पांना भेट देण्यात आली.
     पहिल्या दिवशी पूनम गेडाम, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती, भद्रावती यांची भेट घेण्यात आली. गेडाम यांनी मुलांना एमपीएससी, यूपीएससी परीक्षा, परीक्षेची तयारी आणि त्या अंतर्गत येणारे सर्व पदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
     डॉ.विशाखा शेळकी, मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या विविध कामांची विस्तृत माहिती दिली. तर विजयकुमार जांभूळकर यांनी नगरपरिषदेच्या विविध विभाग आणि त्यांचे कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली.
     योगेश्वर पारधी, ठाणेदार यांनी मुलांना मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मोबाईल वर खेळ न खेळता मैदानी खेळ खेळावा, ज्येष्ठांचा आदर करावा आणि खूप अभ्यास करून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी. भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
     दुसऱ्या दिवशी राजेश भांडारकर, तहसिलदार यांचे सोबत विद्यार्थ्यांनी संवाद साधला. भांडारकर यांनी मुलांना तहसील कार्यालयातून कोणकोणते कामे होतात आणि विविध विभागांची सविस्तर माहिती दिली. प्रज्योत येडे, महसूल सहाय्यक यांनी मुलांना प्रत्येक विभागात जाऊन विभाग आणि कार्य याबाबत महत्वाची माहिती दिली.
     डॉ. विवेक शिंदे यांनी मुलांना डॉक्टर होण्यासाठी लागणारी मेहनत आणि डॉक्टर का बर व्हावे? डॉक्टर हा खरा मानव सेवा करणारा व्यक्ती असतो. त्यासाठी मुलांना अभ्यास आणि परीक्ष्यांबद्दल मोलाची माहिती दिली.
     भद्रावती शहराला होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी होणारी प्रक्रिया तसेच शहरातील कचरा व्यवस्थापन आणि त्यापासून तयार होणारे गांडूळ खत, सेंद्रिय खत, सोन खत तसेच त्यांची प्रक्रिया हे विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष भेट देवून समजावून घेतले. यासाठी डॉ. विशाखा शेळकी यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात प्रशासकिय अधिकारी, डॉक्टर , पोलिस अधिकारी बनण्याच्या प्रवासात त्यांनी अनुभवलेली ही माहिती नक्की उपयोगी ठरतील अशी अपेक्षा आहे. या विशेष उपक्रमासाठी प्रवीण चिमुरकर आणि शिलभद्र मंडळाचे अध्यक्ष भारत खोब्रागडे यांनी महत्वाचे कार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या