चित्रा न्युज प्रतिनिधी
आर्वी : महाराणा प्रताप वार्ड, आर्वी येथे बुद्ध विहार, सार्वजनिक वाचनालय तसेच मूलभूत सुविधांच्या विकासाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमादरम्यान खासदार Amar Kale आणि आमदार Sumit Wankhede यांनी बुद्ध विहार व सार्वजनिक वाचनालयासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सर्व नागरिकांसमोर दिले होते. मात्र, त्यानंतर या विषयावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महाराणा प्रताप वार्डातील नागरिकांनी सांगितले की, यापूर्वीही निवेदनाद्वारे लोकप्रतिनिधींना या मागण्यांची माहिती देण्यात आली होती. वार्डात बुद्ध विहार व सार्वजनिक वाचनालय उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध असून नागरिकांकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी आहे.
तसेच वार्डातील रस्ते, नाल्या आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठीही तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी दिलेला शब्द पाळून महाराणा प्रताप वार्डाच्या विकासाकडे विशेष लक्ष द्यावे आणि बुद्ध विहार, सार्वजनिक वाचनालय तसेच इतर विकासकामांसाठी लवकरात लवकर निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


0 टिप्पण्या