Ticker

6/recent/ticker-posts

विश्वास नरले पाटील यांची मराठवाडा विभागीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड!!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर : -आळंदी देवाची येथे मा. रा. गा. का. पोलीस पाटील संघाची राज्य आढावा बैठक दि. 17 जून रोजी सुयश मंगल कार्यालय आळंदी येथे गावकामगार पोलीस पाटील संघांचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या अध्यक्षते खाली पार पडली, त्यां वेळी उदगीर तालुक्यातील एकुरका (रोड ) गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील व जिल्हा पोलीस पाटील संघांचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वास नरले पाटील यांची त्यांचे संघटनेचे काम पाहून राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी नरले पाटील यांच्या वर मराठवाडा विभागीय कार्यकारी अध्यपदाची जवाबदारी दिली आहे,
राज्यआढावा बैठकीत बोलताना राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील म्हणाले कि विश्वास नरले पाटील यांचे काम वाखानन्या जोगे आहे आणि त्याचे या कामाची दखल राज्य संघटनेने घेतली आहे व त्यांची निवड मराठवाडा कार्यकारी अध्यक्ष म्हणून राज्य संघटणा करीत आहे त्यांच्या कामाचा फायदा संघटणा वाढी करिता होईल असे राज्य अध्यक्ष म्हणाले.
     विश्वास नरले पाटील याची निवड झाल्या बद्दल लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटने मध्ये उत्सहाचे वातावरण आहे,या बद्दल जिल्हा पोलीस पाटील संघटने जिल्हा अध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील यांनी नरले पाटील यांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या!!
     या निवडी बद्दल जिल्हा पोलीस पाटील संघात व विशेष करून उदगीर तालुक्यातील पोलीस पाटील संघामध्ये उत्सहाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या