Ticker

6/recent/ticker-posts

व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने काड्याफिती बनवून खा. संजय दिना पाटील यांचा निषेध


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-जिल्ह्यातील पत्रकार यांनी मोठ्या संख्येत एकत्रित येत, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध आणि कारवाईसाठी भंडारा पोलीस निरीक्षक मुरूल हसन यांना निवेदन देण्यात आले.

 शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा व पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमकीचा व अश्लील शिव्यागाडीचा आम्ही तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक मिळणे ही अत्यंत गंभीर आणि लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारी बाब आहे. पत्रकार हे शासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, निर्भयपणे प्रश्न विचारणे आणि जनतेच्या समस्या मांडणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांचा अवमान होणे, हे मुक्त पत्रकारितेच्या वातावरणासाठी अत्यंत घातक आहे.
खालील मागण्यांचा समावेश
1. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या विधानाची आपण तात्काळ दखल घ्यावी.

2. पत्रकारांचा सन्मान व त्यांची सुरक्षा अबाधित राहील, यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी.

3. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात पत्रकारांना सन्मानाने काम करण्याचे वातावरण मिळावे, ही आमची रास्त अपेक्षा आहे. 
अशा सर्व मागण्यांचे निवेदन व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर यांच्या नेतृत्वात, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पोलीस अधीक्षक भंडारा यांच्यामार्फत देण्यात आले. 
सदर निवेदन देतेवेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी संजय नागदेवे, सागर बागडे, सूरज बागडे, उमेश जांगडे, मुकेश केवट, विलास केजरकर, राकेश श्यमकुवर, समीर नवाज, अभय भुते, अक्षय खोब्रागडे यांच्या सह इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया व सोशल मीडिया चे पत्रकार मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या