Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांची महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कारासाठी निवड

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-शहानिशा श्री. वसंतरावजी नाईक विचारमंच, देवणी आणि एल. बी. एस मिशन, निलंगा जि. लातूर  द्वारा प्रायोजित महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५ या मानाच्या पुरस्कारासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. प्रफुल्लकुमार वसंतराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
 पशुवैद्यक क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल देण्यात येत आहे. त्यांनी नोकरी मध्ये कार्यरत असतानाच पशुवैद्यक शास्त्राशी संबंधित ७ पुस्तके प्रसिद्ध केली, शेतकरी, पशुवेद्यक यांचेसाठी ५० हुन अधिक प्रशिक्षणाचे आयोजन केले, खेडेगावांमध्ये शेतकऱ्यांसाठी १०० हुन अधिक पशुपालक/शेतकरी मेळावे घेतले, सामाजिक भान ठेवून बीड, धाराशिव जिल्ह्यातील चारा छावण्यांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीत पशुआहार नियोजन याबाबत मार्गदर्शन केले, २०१९ मध्ये सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पशुउपचार, लसीकरणाचे कार्य केले,  अग्रोवन पेपर, मासिके यातून २६० हुन अधिक मार्गदर्शनपर लेखाद्वारे जनजागृती केली, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर द्वारा प्रायोजित दूध जागरूकता अभियान, अंडी जागरूकता अभियान तसेच रेबीज जागरूकता अभियान यामध्ये हिरहिरीने सहभाग घेऊन जनजागृती केली, त्यांच्या १६ यशोगाथा प्रसिद्ध आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात गोठ्यावरती जाऊन मार्गदर्शन करून यशस्वी पशुपालनासाठी मार्गदर्शन केले, दत्तक गावामध्ये नोडल अधिकारी, संयोजक म्हणून शेकडो चारा प्लॉट तयार केले, पाणी फाऊंडेशन आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर द्वारा आयोजित डिजिटल पशुधन शाळेमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र भरातील पशुपालकांना मार्गदर्शन करीत आहेत, महाराष्ट्रभर १५० हुन अधिक व्याख्याने दिली आहेत, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथे देवणी संग्रहालय स्थापन्यामध्ये हिरहिरीने सहभाग, पशुपालकांना ३ वेळा दूरदर्शन मुलाखतीद्वारे आणि १५ वेळा रेडिओ मुलाखतीद्वारे मार्गदर्शन केले, ८ प्रशिक्षण पुस्तिकेचे संपादन केले, ८ प्रकल्पामध्ये समन्वयक, सह-समन्वयक, सह-संशोधक म्हणून कार्य केले. ५० हुन अधिक संशोधन व रिव्हिव्ह पेपर प्रसिद्ध, अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध करणाऱ्या जर्नलचे रिव्हीवर म्हणून कार्य केले, २० हुन अधिक वेळा पुरस्कार व प्रशस्तिपत्रकाने सन्मानित करण्यात आले आहे, अनेक राष्ट्रीय कार्यशाळा, परिषदा आयोजनामध्ये सहभाग त्याचबरोबर ५० हुन अधिक पशुप्रदर्शनामध्ये निवड अधिकारी म्हणून कार्य केले. हा पुरस्कार दि. 1 जुलै 2026 रोजी निलंगा येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या