पत्रकारांना धमकी म्हणजे लोकशाहीला आव्हान; दोषींना कोणतीही माफी नाही - मुख्यमंत्री
चित्रा न्युज ब्युरो
मुंबई: राज्यातील पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे अथवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे यासारख्या घटनांकडे राज्य सरकार अत्यंत गंभीरपणे पाहत असून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार आणि माध्यमे हे चौथे स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या समस्या आणि शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या किंवा दबाव टाकण्याचे प्रकार हे केवळ व्यक्तीवरील हल्ले नसून लोकशाही व्यवस्थेवरील थेट आघात आहेत.
पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, त्यांना आवश्यक संरक्षण मिळावे आणि अशा घटनातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येतील तसेच कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक दबावाला बळी न पडता दोषीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले, "पत्रकारांना धमकी देणे म्हणजे लोकशाहीला आव्हान देणे होय. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध आहे."
*मुख्यमंत्र्यांचे 5 ठोस निर्देश:*
1. *पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी*
2. *संबंधित आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून अटक करावी*
3. *पत्रकारांच्या हल्ल्याने सुनावणी थांबविणाऱ्यांवर आवश्यक कारवाई करावी*
4. *पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी*
5. *पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा उभारावी*
____________________________________
*मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा!*
*पत्रकारांना धमकावणाऱ्यांना थेट जेल! देवेंद्र फडणवीस म्हणाले - 'पत्रकारांना धमकी म्हणजे लोकशाहीला आव्हान'. दोषींना माफी नाही, कठोर कारवाईचे निर्देश. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणार.*


0 टिप्पण्या