हंडरगुळी येथील प्रकार..
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातुर :-उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे मोकाट गाय,म्हैस,वासरं यांनी शेतात धिंगाणा आणि बाजारपेठेत गोंधळ घालत छञपती शिवाजी चौकात थांबा केल्याने वाहतुकीस अडथळा होतोय.तसेच अन्न धान्याचे नुकसान करत असल्याने शेतकरी,व्यापारी वैतागले आहेत.
तसेच हा प्रकार कित्येक महिण्यापासून होत आहे. तरी सुद्धा मोकाट गुरांना वेसन घालत नसल्याने ग्रा.पं.प्रशासनावर शेतकरी व व्यापारी नाराज झाले असून याचा हाबाडा आगामी निवडणुकीत देणार ! अशी भाषा ते करतात.
या बाबत ग्रा.पं.प्रशासनाला कळवूनही मोकाट गुरांना वेसन न घालता पाठीशी घालत असल्याने सखेद आश्चर्य व संताप शेतकरी अजित भोसले-पाटील व अरुण भोसले-पाटील यांनी व्यक्त केले.
उदगीर नंतर तालुक्यात मोठी बाजारपेठ असलेल्या या गावात अनेकांची शेकडो एकर शेती गावकरीला अन् महामार्गाला लागुनच आहे.
तर ज्यांच्याकडे पसाभर ही शेती नाही.अशा लोकांनी गुरे घेतली असून लहान मोठी जनावरे मिळून ५० जनावरांचा कळप आहे. व ते मोकाट सोडल्यामुळे दुकाणातील व शेतातील अन्न,धान्याची राञंदिवस नासाडी करतात.म्हणुन या गावातील शेतकरी,व्यापारी बांधवांचे मोठे नुकसान होते तसेच या मोकाट गुरांचा छञपती शिवाजी चौकात ठिय्या असतो.यामुळे वाहन चालकांसह पदचा-यांना ये- जा करणे कठीण झालेय. या मोकाट गुरांनी सर्वञ हैदोस घातला असून यातुन सामाजिक शांतता कधीही भंग होण्याच्या मार्गावर आहे.आणि याची कल्पना असूनही ग्रा.पं.मुकदर्शक का बनली आहे.यामागचा 'अर्थ' काय.असे सवाल शेतकरी अरुण भोसलेंनी उपस्थित केला आहे.
गुरे चोरीची असल्याची चर्चा..!
ज्यांच्याकडे पसाभर सुध्दा शेती नाही.अशा कांही लोकांची ही मोकाट गुरे आहेत.माञ,ती गुरे कधीच त्यांचे जे कुणी मालक आहेत ते त्यांच्या घरी बांधत नाहीत.सदा मोकळे सोडतात.जर ती जनावरे विकतची असती तर त्यांच्या कानात 'टॅगींग टेप' का नाही?हा सवाल सुज्ञ हाळीकरांतुन चर्चीला जातो म्हणुन मोकाट गुरांची खरी 'कुंडली' शोधली तर चोरी उघडकीस येऊ शकते.असे सुज्ञ नागरीकात बोलले जाते.तेंव्हा मोकाट गुरांची *कुंडली* शोधणार कोण?


0 टिप्पण्या