Ticker

6/recent/ticker-posts

बाल धम्म संस्कार शिबिराचा समारोप

शिलभद्र मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा यांचा संयुक्त उपक्रम

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : शहरातील गौतम नगर येथील अशोका बुद्ध विहाराच्या प्रांगणात शिलभद्र मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ ते ३१ मे पर्यंत पाच दिवस बाल धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा समारोपीय कार्यक्रम दि. ३१ मे ला कार्यक्रमाचे अध्यक्ष, अचितराव करमनकर, शहर अध्यक्ष भद्रावती तसेच भारतीय बौद्ध महासभा, जिल्हाध्यक्ष किशोर तेलतुंबडे, कोषाध्यक्ष, गुरूबालक मेश्राम, शहर अध्यक्ष, भाऊराव दुर्योधन, कविता चांदेकर, केंद्रिय शिक्षीका, प्रफुल भगत, लेफ्टनंट कर्नल, समता सैनिक दल आणि भारत खोब्रागडे, अध्यक्ष शिलभद्र मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
     या शिबिरात वंदना, त्रिसरन, पंचशिलाचे मराठी अनुवाद, पंचांग प्रणाम, सिद्धार्थ गौतमाचे बालपण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र, बौद्धांचे सन आणि मंगल दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांना संदेश अशा अनेक विषयाची माहीती या पाच दिवशीय शिबिराच्या माध्यमातून मुलामुलींना देण्यात आली. शिबिराच्या अंती सर्व मुलामुलींना भारतीय बौद्ध महासभा कडून प्रमाणपत्र देण्यात आले.
     शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून किशोर तेलतुंबडे, कविता चांदेकर, कविता खैरे, उषा तामगडे यांचे सहकार्य लाभले. तसेच शिबिराला यशस्वी करण्यासाठी शिलभद्र मंडळाचे अध्यक्ष भारत खोब्रागडे, अनिल बांबोडे, सागर कांबळे, प्रांजल कांबळे, सारिका पथाडे, हरिदास जवादे तसेच राजेश चांदेकर यांनी अथक प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या