चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई, – रविवार, ७ जून २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता अंधेरी (प.), मुंबई येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राच्या महिला विकास विभागातर्फे इच्छुक वधू-वर तसेच घटस्फोटीतांसाठी भव्य परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजात समता, बंधुता, परस्पर सन्मान आणि सुदृढ कुटुंबव्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून हा मेळावा केंद्राचे अध्यक्ष आयु. विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
मेळाव्याचे आयोजन सिद्धार्थ बँक्वेट, तळ मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड मार्ग, लोखंडवाला रोड, चार बंगला, अंधेरी (प.), मुंबई – ४०० ०५३ येथे करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या प्रेरणादायी विचारातून समाजात समतेवर आधारित सुसंस्कृत व सशक्त नातेसंबंध निर्माण व्हावेत, या उदात्त भावनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विवाहासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी या मेळाव्याचा अवश्य लाभ घ्यावा. केंद्राच्या वतीने दर शनिवारी व रविवारी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत वधू-वर सूचक मंडळ, पहिला मजला येथे नोंदणी सुरू असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक २६३३६६७१ / २६३९४७१७ येथे संपर्क साधावा, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या