चित्रा न्युज प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर :-माहूर तालुक्यातील सुप्रसिद्ध समाजसेवक माधवराव परसराम जाधव पाटील हडसनिकर वय 84 वर्ष यांचे वृद्धापकाळाने दि 26 रोजी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी राहत्या घरी निधन झाले
माधवराव पाटील हडसनीकर हे किनवट पंचायत समिती असताना त्यांनी सभापती पद भूषविले तर दोन वेळा मौजे हडसनी गावचे सरपंच पद ही भूषविलेले आहे समाजसेवेतील प्रत्येक कार्यात अग्रेसर राहत असल्याने त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झालेला होता
त्यांचे वर मौजे हडसनी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यांचे पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सुन नातवंडे असा परिवारआहे


0 टिप्पण्या