Ticker

6/recent/ticker-posts

निसर्गाची आस आणि बळीराजाचा श्वास

निसर्गाची आस आणि बळीराजाचा श्वास

पावसाविना हा पावसाळा, वाटे अगदी ओसाड,
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत साठली, पावसाची आस दाट.
मशागत पूर्ण झाली तरी, माती दुभंगलेली तशीच,
पाऊस न बरसल्याने, शेताची ही अस्वस्थ स्थिती अशीच!

बी-बियाणे खांद्यावर घेऊन, बळीराजा उभा सज्ज,
मेघराजा! तुझी वाट पाहतोय आता, होऊनी निमग्न.
आभाळात दाटून येतात कधी, ढगांचे हे ढिगाळे,
क्षणार्धात कुठे गायब होती, न कळे हे कोडे!

वार्ता येते कानी यंदा, 'एल-निनो'चे हे संकट,
बातमी ऐकूनच होते, साऱ्यांचे मन भयभीत.
जागृत हो रे माणसा, आता तरी धर हा निग्रह,
झाडे तोडणे थांबव, आणि पुन्हा जप हा निसर्ग.
आम्ही नांदगावचे सवंगडी, लावणार आता हजार झाडे,
हिरवीगार शाल पांघरून, फुलवूया वसुंधरा वेडे!
संकल्प करूया सर्वांनी, देश हा हिरवागार करायचा,
निसर्गाचा समतोल पुन्हा, आपल्यालाच सावरायचा.

~कवी: सुरज भिमराव अंभोरे
एम.एस.सी(रसायनशास्त्र),एम.ए.(मराठी,इतिहास) बी.एड
रा. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती)
भ्रमणध्वनी: ८६००७१५०२९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या