Ticker

6/recent/ticker-posts

कोकळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन व ECG शिबिर संपन्न


37 नागरिकांचे ECG काढण्यात आले

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे योगा करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. तसेच उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचे आजार असलेल्या रुग्णांची ECG तपासणी करण्यात आली. योगाच्या माध्यमातून समाजामध्ये लोकांमध्ये योग प्राणायाम याची आवड निर्माण करणे योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देणे लोकांना योग केल्यामुळे होणारे फायदे काय असतात याची माहिती दिली व योग आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष करतात त्यांना या योगा दिनानिमित्त योगाचे महत्त्व पटवून दिले गेले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भावी आयुष्य सुदृढ आणि निरोगी होण्यासाठी योग अतिशय आवश्यक आहे याची जाणीव निर्माण करून दिली तसेच सर्वांनी दिवसाची सुरुवात जर योगाने केले तर मानसिक ताणतणाव दूर होतो थकवा येत नाही व मन सतत प्रसन्न राहते मेडिटेशन च्या माध्यमातून सामाजिक मानसिक व शारीरिक स्थैर्यता प्राप्त होते आणि ती निर्माण करण्याचं कार्य योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्यात येते याबद्दल माहिती देण्यात आली.
          सदर योग दिन व ECG शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ.संजय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीपकुमार जाधव, डॉ.श्रीनिवास मोरे व मदनसुरी प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा मुळजे, डॉ.शितल साळुंखे, डॉ.वाघमारे, आरोग्य निरीक्षक ओमप्रकाश भोजने, जी.जी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
ECG तपासणीसाठी विशेष सहकार्य आणि परिश्रम प्रा.आ. केंद्र मदनसुरीच्या अधिपरिचारिका छाया कांबळे यांनी घेतले.
         ECG शिबिर व योग दिन यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचारी राहुल भोसले, आरोग्यसेविका छाया जाधव, आशा स्वयंसेविका निर्मला कांबळे, लता कांबळे, उर्मिला पाटील, चमाबाई सूर्यवंशी, यास्मिन शेख, सुमन शेंडगे,रचना जगताप व वाहनचालक प्रदीप माने, सेविका कमलबाई सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या