Ticker

6/recent/ticker-posts

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी 'रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा'!


*्भद्रावतीच्या शासकीय रुग्णालयात शिवसेना उबाठा कडून रुग्णांना फळवाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती: युवा नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भद्रावती येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळवाटप करून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

'रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' या भावनेतून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी रुग्णांची आस्थेवाईक चौकशी करत "प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी" अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. रुग्णांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर देण्याचाही प्रयत्न शिवसैनिकांनी केला.

जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाप्रमुख नरेश काळे, तालुका संघटक सचिन डुकरे, शहरप्रमुख अश्विन हेमके आणि महिला जिल्हा संघटक भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला.

"वाढदिवस हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून समाजसेवेची प्रेरणा देणारा दिवस ठरावा," अशी भावना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतानाच त्यांच्या प्रेरणेने भविष्यातही समाजहिताचे उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


-----------------------------------------------
🎂आदित्य ठाकरेंचा वाढदिवस 'सेवे'ने साजरा!

भद्रावतीच्या शासकीय रुग्णालयात उबाठा शिवसेनेकडून रुग्णांना फळवाटप. जिल्हाप्रमुख भास्कर ताजने, नरेश काळे, सचिन डुकरे, अश्विन हेमके, भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात उपक्रम. "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" म्हणत रुग्णांची आस्थेवाईक चौकशी. 'वाढदिवस = समाजसेवेची प्रेरणा' असा संदश.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या