चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-आज दिनांक १५जून २०२६ रोजी शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,हंडरगुळी ता. उदगीर येथे नवगतांचे प्रवेशोत्सव व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे विद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रत्येक उपस्थित इ.५ वी ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याधापक तांबरे डी. एम. व पर्यवेक्षक सुगावे बी. सी यांनी विद्यार्थ्यांना सन २०२६ - २०२७ या शैक्षणिक वर्षासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद सौ. बिरादार के.के, सौ.येलाले के.व्ही, सौ.कनकुरे एम. एम,सौ. गायकवाड पी.एन, मोमीन ए. एस, कणसे व्ही.एस, मैलारे एम. टी, जाधव आर. जी, बगाडे टी. एस, गायकवाड बी.ए,सौ. नारागुडे के.पी, सौ. भंडारे एस. जी,सो गुडाप्पे आर. एस , आर. एम. पाटील. गायकवाड एस बी , रामचंद्र घटकार, नाटकरे बी.एस,सौ. संगमवार एस.टी, सौ. कुरुळेकर एस. एन,अभिजित भोसले, तांबोळी सुमयाँ,सौ. शंकुतला कांबळे, सौ. विशाखा कांबळे, सौ. शेख ए.वाय,विनित सुर्यवंशी, मळभागे शिवानंद, भोसले अरविंद, माधव वाघमारे व गावातील सर्व पालकांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या