~~~~~~~~~~~~~~~~~~~
बापाला कधी म्हणू नका आमच्यासाठी काय केलं, कारण त्याचं उत्तर शब्दांत बसत नाही. तो बोलत नाही म्हणून त्याचं कष्ट कमी ठरत नाहीत. स्वतःच्या इच्छा मारून तो घराच्या गरजा पूर्ण करत असतो. त्याच्या थकलेल्या चेहऱ्यामागे आपल्यासाठीचं स्वप्न दडलं असतं.
ओपैसे कमवायला बाहेर पडाल तेव्हा कळेल रोज स्वतःला मागे ठेवणं म्हणजे काय. उन्हातान्हात काम करूनही तो तक्रार करत नाही. आपली भूक भागावी म्हणून तो अनेकदा स्वतःची भूक गिळतो. आपलं भविष्य उजळावं म्हणून तो वर्तमान झिजवतो.
त्याचं प्रेम शब्दांत नसतं तर जबाबदारीत असतं. त्याचा रागही आपल्यासाठीचं संरक्षण असतं हे उशिरा कळतं. बाप जिवंत असताना त्याचं मोल समजत नाही हीच शोकांतिका आहे. म्हणून बापाला प्रश्न विचारण्याऐवजी त्याच्या कष्टांना मान द्या, कारण तेच तुमच्या आयुष्याचा पाया असतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
❤️हॅपी फादर्स डे❤️
आज फादर्स डे. बाप म्हणजे घराचा कणा. न बोलता सगळं सहन करणारा, स्वतःचे अश्रू लपवून आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारा आपला सुपरहिरो. त्याच्या खिशात भले कमी पैसे असतील, पण बापाची सावली असेपर्यंत उन्हाची झळ लागत नाही. तो आहे तोपर्यंत आपण राजकुमार असतो. त्याच्या सुरकुत्यांमध्ये आपलं बालपण लपलेलं असतं. त्याच्या फाटक्या चपलांमध्ये आपलं कॉलेजचं स्वप्न असतं.
आज त्याला फक्त 'थँक यू पप्पा' म्हणू नका. त्याचा हात हातात घ्या, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवा. तो थकलाय, पण तुमच्यासाठी तो अजूनही लढतोय.
ज्यांचे वडील नाहीत त्यांच्यासाठी:
बापाच्या आठवणी म्हणजे आयुष्यभराची शिदोरी. त्याने शिकवलेले संस्कार हेच त्याचं खरं अस्तित्व. आज त्याच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन सांगा, "पप्पा, तुमची शिकवण अजून जिवंत आहे."
बाप कधीच जात नसतो. तो आपल्या श्वासात, आपल्या सवयींमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये जिवंत असतो.
सर्व बापमाणसांना फादर्स डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏
__________________________________
1. बाप म्हणजे ATM नाही, तो आपला पहिला ATM होता, ज्याने न मागता सगळं दिलं.
2. आईच्या मायेला शब्द असतात, बापाच्या मायेला फक्त कृती असते.
3. बापाचे जुने शर्ट आजही इस्त्री करून ठेवावेत, कारण त्यात घामाचा वास नाही, तर प्रेमाचा दरवळ असतो.
राजेश येसेकर भद्रावती : 7756963512
बापाला टॅग करून ही पोस्ट शेअर करा.


0 टिप्पण्या