Ticker

6/recent/ticker-posts

मोहरम निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भद्रावती मोहरम बहूउद्देशीय उत्सव समिती ( सर्वधर्म समभाव ) तर्फे विविध कार्यक्रम दिनांक 26 जून ला सायंकाळी 5 ते रात्रौ 10 वाजे पर्यंत गांधी चौक भद्रावती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गांधी चौक येथे संपूर्ण चौकात लायटिंग - रोषणाई - पताका - स्वागत गेट - ढोल ताशे इत्यादिनी सजावट करण्यात येते यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात 
अनेक सामाजिक संघटने मार्फत शरबत - लंगर - मिठाई - प्रसाद - पिण्याच्या पाण्याचे वितरण होत असते या मध्ये व्यापारी असोसिएशन - ऍटो असोसिएशन - भद्रावती पत्रकार असोसिएशन सामाजिक संघटनेचा सहभाग राहत असतो भद्रावती तालुक्यातून शहरातून व प्रत्येक वार्डा -  वार्डातून सवऱ्या - ख्वाजा - ताजे - पंजे - डोले गांधी चौकात एकत्र येऊन भेटीगाटी घेतात व याला जत्रेचे स्वरूप येत असते गेल्या वीस वर्षा पासून सदभावना - भाईचारा - 
कोमी एकता - देशभक्ती - शांतता कायम ठेवण्याचे कार्यक्रम समिती मार्फत होत असते मोहरमची पहिली ला मोहरम ची सुरवात होते व मोहरमच्या चवथी ला व मोहरम च्या पाचवी ला सवऱ्यांची स्थापना होत असते व मोहरमच्या सातवी व नववी ला रात्रौ सवऱ्या व खाजा हे प्रत्येक दरग्यावर भेटी गाटी घेत असतात आणि मोहरमच्या दहावी ला मोहरम ची सांगता गांधी चौक येते होतात 
या कार्यक्रमात स्त्री - पुरुष दोन - तीन हजार भाविक भक्तगण व बाहेर गावातील लोक दर्शनाकरिता उपस्थित राहतात 
या कार्यक्रमा करिता उपस्थित राहण्याचे आव्हान राजू गैनवार समितीचे सचिव व माजी नगरसेवक - उमेश मेश्राम माजी नगरसेवक - प्रफुल चटकी नगराध्यक्ष नगर परिषद भद्रावती - ऍड सुनिल नामोजवार नगरसेवक - अनिल धानोरकर माजी नगराध्यक्ष - सिकंदर शेख सामाजिक कार्यकर्ता - शेख रब्बानी - निलेश पाटील - जावेद शेख - सागर 
जट्टलवार - प्रशांत बदखल - जगन दानव खेमचंद हरियानी - विलास गुंडावार - संजय बॅनर्जी इत्यादीनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या