Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची सभा संपन्न




जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती : मा. जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर, भा.प्र.से. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची आढावा सभा आज संपन्न झाली. या सभेला सचिव श्री राजेंद्र जाधवर साहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  विभाग अमरावती, महानगरपालिकाआयुक्त चे प्रतिनिधी श्री शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी व समाज कल्याण विभागातील  विभाग प्रमुख  उपस्थित होते. 
सभेच्या सुरुवातीला समितीचे सचिव श्री. राजेंद्र जाधवर साहेब यांनी उपस्थितांना प्रस्ताविक केले व गेल्या सभेपासून झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर केला.  
या सभेत ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. प्रादेशिक अध्यक्ष श्री. पी. टी. गावंडे व जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. दामोदर पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या  समस्यांवर जिल्हाधिकारी महोदयांचे लक्ष वेधले.
अमरावती शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून  ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी  विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे. तसेच दिर्घ कालीन उपाय म्हणून भव्य ज्येष्ठ नागरिक कल्याण भवन उभारण्यात यावे. माननीय पोलीस आयुक्त व माननीय पोलीस अधीक्षक यांच्या अधिपत्याखालील  सर्व पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करून एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांची नोंदणी करावी व दर महिन्याला कक्षाची सभा घेऊन त्यांच्या तक्रारीचा निपटारा करावा. महानगरपालिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करू एक खिडकी योजनेतून सर्व सुविधा ज्येष्ठांना देण्यात याव्यात. दर दोन महिन्याला आढावा  सभा घेण्यात यावी. शासनाचे ज्येष्ठ नागरिक धोरण 2018 नुसार सर्व विभागांनी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात यावी. शहरातील अपंग निराधार ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करून नोंदणी करावी त्यांना संजय गांधी श्रावणबाळ योजनेचा   लाभ मिळवून देण्यात यावा
ज्येष्ठांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत मा. जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर यांनी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून पुढील सभेत अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या.
 यावर  पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्री पुरूषोत्तम गावंडे यांनी सांगितले कि अमरावती शहरात ४४ ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. ज्येष्ठ नागरिकांना योग्य सुविधा पुरविण्याचे शासनाचे धोरण आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समस्याची दखल घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी सर्व विभागाने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 
 तसेच  अमरावती जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष श्री दामोदर पवार म्हणाले ज्येष्ठ नागरिक धोरण 2018 फक्त फाईल मध्ये राहतात कामा नये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनामुळे वडीलधाऱ्यांना तातडीचा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करुन सर्वांचे आभार मानून सभेची सांगता झाली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या