चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती : भारतीय लोकशाहीत एकूण चार स्तंभ आहेत त्यापैकी एका स्तंभाला तुडवण्याची भाषा केली जात आहे.याचे कारण आमच्यातील काही पाकिटामार पत्रकारांनी शोधावे.आपले काम जर प्रामाणिकपणे, ताठ मानेने केले असते तर अशी भाषा ऐकावी लागली नसती.!
देशाचा चौथा स्तंभ आता पहिल्या सारखा मजबूत राहिला नाही. कोणी पण येतो आणि टांग वर करून जातो. आमच्यातील काही मिडियाचे लोकांनी जर या गेल्या १४ वर्षात स्वाभिमान,निर्भिडता कर्तव्य जपली असती तर ही वेळ आली नसती.
खासदार संजय दिना पाटील यांनी आज आमच्या पत्रकारांशी बोलताना ज्या पद्धतीची भाषा वापरली त्यामध्ये सत्तेची मग्रुरी,त्याचबरोबर आपल्याला कोणीही काही करू शकत नाही अशा पद्धतीचा माज आहेच. त्याशिवाय पत्रकार हे गुलाम आहेत अशा पद्धतीची वृत्ती दिसते.यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले स्पष्टीकरण अत्यंत अपुरे आणि अप्रत्यक्षरीत्या संजय दिना पाटील यांची पाठराखण करणारे आहे. हा सर्व प्रकार निषेधार्थ आहेच पण त्यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. असा माणूस महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून संसदेत असणे हे महाराष्ट्रासाठी शरमेने खाली मान घालायला लावणारे आहे.!
_____विद्रोही अविनाश गोंडाणे अमरावती 9923264193


0 टिप्पण्या