Ticker

6/recent/ticker-posts

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पल्स पोलिओ अभियान कार्यशाळा संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती:-उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर प्रमोद पोतदार यांचे मार्गदर्शनाखाली पल्स पोलिओ अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची लस पाजण्यासंदर्भात सविस्तर माहिती डॉ पोतदार यांनी दिली.
         आधीपरिचारिका जयश्री मोरे यांनी उपस्थित सर्व रुग्णालयातील कर्मचारी तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका यांना येणाऱ्या 28 जून 2026 रोजी मोर्शी शहरात उभारण्यात आलेल्या 21 पल्स पोलिओ बुठवर पोलिओची सुविधा उपलब्ध राहणार असल्याबाबत माहिती दिली. "दोन थेंब जीवनाचे - पोलिओ मुक्त भारताचे" पोलिओ मुक्त भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी पल्स पोलिओ अभियान राबविण्यात येत आहे आपल्या बालकाचे निरोगी व सुरक्षित भविष्य घडविण्यासाठी या राष्ट्रीय अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा कोणीही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याबाबत त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या