Ticker

6/recent/ticker-posts

राकेश चकोले यांना गुणगौरव पुरस्कार जाहीर

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-नवजीवन विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय जमनापूर येथील शिक्षकेतर कर्मचारी राकेश रामभाऊ चकोले यांची महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ करिता निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी येथे पार पडणार आहे. या पुरस्कारात गिफ्ट, ट्रॉफी, प्रमाणपत्र तसेच पारंपरिक महाराष्ट्र फेटा इत्यादींचा समावेश आहे. सदर पुरस्का सोहळा वितरण कार्यक्रम " बी द चेंज ( चला बदल घडवू या ) फाउंडेशन शिर्डी तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर फाउंडेशन, आपल्या कौशल्यपूर्व कार्याने, सातत्यपूर्ण परिश्रमाने आणि नाविन्यपूर्ण सर्जनशीलतेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीकरीता हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. या यशाचे श्रेय राकेश चकोले यांनी वैगंगा बहुउद्देशीय विकास संस्था संस्थापक डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, सचिव डॉ. वृंदाताई  करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, मुख्याध्यापक डॉ. लोकानंद नवखरे प्राचार्य डॉ. आतिश शहारे, डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर, डॉ. सुनील चतुर्वेदी यांना दिलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या