Ticker

6/recent/ticker-posts

उमरी( अड्याळ) येथे रोजगार हमी योजनेचे काम सुरु


190 मजुरांना मिळाला रोजगार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-पवनी तालुक्यातील  अड्याळ जवळील उमरी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गगनी तलाव खोलीकरण( गाळ काढणे) च्या कामाला 27 मे 2026 रोजी सुरवात आली.

   तलाव खोलीकरण कामाचे उदघाटन  सरपंचा शशिकला शिवणकर यांनी केले.ह्यावेळी उपसरपंच राष्ट्रपाल भोयर,ग्राम पंचायत सदस्य शोभिवंत गेडेकर,ग्राम पंचायत सदस्या सुवर्णा चंदनबावणे,  ग्राम रोजगार सहाय्यक गुणवंत लोणारे,मजूर मेट देवचंद भुजाडे,सौरभ शिवूरकर आदी उपस्थित होते.
   
   रोजगार हमी योजने अंतर्गत तलाव तलावातील गाळ काढण्याच्या कामावर 190 मजूर काम करीत असून त्यामध्ये 120 महिला आणि 70 पुरुष मजुरांचा समावेश आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्राम स्तरावर मजुरांना काम मिळाल्याने  मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या